नवी दिल्लीः अदानी ग्रुपच्या ग्रीन एनर्जी लिमिटेड(एजीईएल)ला मोठे यश मिळाले आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड(एजीईएल)ला जगातील सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे कंत्राट मिळाले असून, हा करार 45 हजार कोटींच्या घरात आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, अदानी ग्रीन एनर्जीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.कंपनीला हा करार सौरऊर्जा निगम (एसीसीआय)कडून मिळाला आहे. त्याअंतर्गत कंपनी 8 जीडब्ल्यू सौर प्रकल्प विकसित करणार आहे. त्याचबरोबर दोन गीगावॉट व्यतिरिक्त सोलर सेल आणि मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंगक्षमता देखील स्थापित करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, जगातील हा प्रकार सर्वात मोठा करार आहे.अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यासाठी 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे कंपनी 2025पर्यंत 25 जीडब्ल्यू उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे ध्येय गाठू शकेल. यासाठी पुढील पाच वर्षांत नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात 1,12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.4 लाख लोकांना रोजगार मिळणारअदानी ग्रीन एनर्जीनुसार या प्रकल्पातून चार लाख लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल. या प्रकल्पाच्या कार्यालयामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन आयुष्यभर 90 दशलक्ष टनांनी कमी होईल. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला. गौतम अदानी म्हणाले, हवामान बदलाबाबत आपल्या देशाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबरोबरच स्वावलंबी भारत अभियानात सहभागी होण्याच्या दृष्टीनं उचललेलं आणखी एक पाऊल आहे. या वृत्तामुळे अदानी ग्रीनच्या वृत्ताचा फायदा झाला. ही मोठी रक्कम मिळाल्यानंतर कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांनी वधारून 312.75 रुपयांवर पोहोचले होते. सध्या कंपनीचं बाजारपेठ मूल्य 48,914 कोटी रुपये आहे.
अदानी ग्रुपला मिळालं सर्वात मोठं सोलर प्रोजेक्टचं कंत्राट, 45000 कोटींचा करार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 8:01 PM