अदानी समुहाच्या अदानी ग्रीन या कंपनीनं आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 51 टक्क्यांनी वाढून 323 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 214 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याशिवाय कंपनीच्या महसुलात 33 टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल ते जून या कालावधीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 33 टक्क्यांनी वाढून 2176 कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत 1635 कोटी रुपये होता.
पॉवर सप्लायचा महसूल 55 टक्के वाढला
पहिल्या तिमाहीत वीज पुरवठ्यातून मिळणारा महसूल 55 टक्क्यांनी वाढून 2059 कोटी रुपयांवर पोहोचला. या विभागाचा EBITDA वार्षिक 53 टक्क्यांच्या वाढीसह 1,938 कोटी रुपयांवर पोहोचला. मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत 1750 मेगावॅट सोलारविंड हायब्रिड, 212 मेगावॅट सौर आणि 554 मेगावॅट पवन उर्जा प्रकल्पांसह ऑपरेशनल क्षमता वार्षिक 43 टक्क्यांनी वाढून 8,316 मेगावॅट झाली.
काय आहेत निकाल?
आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत वीज विक्री वार्षिक 70 टक्क्यांनी वाढून 6,023 मिलियन युनिट झाली आहे. याशिवाय सोलार पोर्टफोलिओ वार्षिक 40 बेसिस पॉईंट्सनं वाढून 26.9 टक्के झालाय. विंड पोर्टफोलिओमध्ये वीज विक्री 34 टक्क्यांनी वाढली आहे. विंड सीयुएफ गेल्या वर्षीच्या तुलनेत लोवर विंड स्पीडमुळे कमी झालेय.