मुंबई : उद्याेगपती गाैतम अदानी यांच्या ‘अदानी एअरपाेर्ट हाेल्डिंग्स लिमिटेड’ कंपनीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमधील २३.५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. सुमारे १ हजार ६८५ काेटी रुपयांचा हा व्यवहार झाला असून, संबंधित नियामक प्राधिकरणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या प्रकल्पातून ‘जीव्हीके’ समूह बाहेर पडणार आहे. या समूहाचा ५०.५ टक्के हिस्सादेखील अदानी यांच्या कंपनीतर्फे खरेदी करण्यात येणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कंपनीचा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ७४ टक्के हिस्सा हाेणार आहे. अदानींनी ‘एसीएसए ग्लाेबल’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (माॅरिशस) बिडव्हेस्ट यांच्याजवळचे २८ काेटी २० लाख शेअर्स खरेदी केले. गेल्या वर्षी ३१ ऑगस्टला याबाबत माहिती देण्यात आली हाेती. या व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयाेगानेही मान्यता दिली हाेती. विमानतळातील उर्वरित २६ टक्के हिस्सा हा भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना मार्च २००६ मध्ये करण्यात आली हाेती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास आणि परिचालनाचे काम या कंपनीकडे आहे.
सर्वात माेठा समूह
अदानी समूहाकडे यापूर्वीच लखनौ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि बंगळुरू येथील विमानतळांच्या संचालनाचीही यापूर्वीच परवानगी मिळाली आहे. आता त्यात मुंबईदेखील जाेडली गेल्यामुळे देशातील सर्वात माेठा विमानतळ संचालन करणारा समूह झाला आहे. मुंबईसाेबतच नवी मुंबई विमानतळाची धुरादेखील अदानी समूहाकडे येणार आहे.
अदानी समूहाचे मुंबई विमानतळावर चेक इन!
२३.५ टक्के भाग खरेदी; सहा विमानतळांचे अधिग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:55 AM2021-02-11T03:55:14+5:302021-02-11T03:55:40+5:30