Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani ग्रुपची कमाल! ३० ₹चा शेअर २१०० वर; ७ हजार टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल

Adani ग्रुपची कमाल! ३० ₹चा शेअर २१०० वर; ७ हजार टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल

केवळ ३ वर्षांत अदानी ग्रुपच्या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली असून, ३० रुपयांचा शेअर २ हजारांवर गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:14 PM2022-02-18T22:14:59+5:302022-02-18T22:16:29+5:30

केवळ ३ वर्षांत अदानी ग्रुपच्या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली असून, ३० रुपयांचा शेअर २ हजारांवर गेला आहे.

adani group adani green energy share multibagger stock investors got 7000 percent bumper return in just 3 years | Adani ग्रुपची कमाल! ३० ₹चा शेअर २१०० वर; ७ हजार टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल

Adani ग्रुपची कमाल! ३० ₹चा शेअर २१०० वर; ७ हजार टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल

नवी दिल्ली: गौतम अदानी यांचा Adani ग्रुप गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुपमधील एका कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. केवळ ३ वर्षांच्या कालावधीत अदानी ग्रुपच्या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल ७ हजार टक्के परतावा दिला आहे. 

अदानी ग्रुपमधील या कंपनीचे नाव अदानी ग्रीन आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अदानी ग्रुपचा शेअर ३० रुपयांवर होता. आताच्या घडीला हा शेअर २१०० रुपयांवर ट्रेंडिंग करत आहे. अलीकडेच अदानी ग्रीनच्या मार्केट कॅपने ३ लाख कोटींचा टप्पा पार केला. यासह अदानी ग्रीन कंपनी आयटीसी आणि टायटन यांपेक्षाही मोठी कंपनी बनली आहे. 

१ लाखाचे झाले ७० लाख

अदानी ग्रीनच्या कंपनीत ३ वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तींने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आताच्या घडीला त्या व्यक्तीला ७० लाखांपर्यंत परतावा मिळू शकला असता. मुंबई शेअर बाजारात या अदानी ग्रीन कंपनी २१२८ अंशांचा आपला ऑल टाइम उच्चांकांवर आहे. एकीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू असताना, अदानी ग्रीनचा शेअर तेजीत होता. केवळ ४ दिवसांत या शेअरने ११ टक्क्यांची वाढ नोंदवली. 

दरम्यान, २२ जून २०१८ रोजी अदानी ग्रीनचा शेअर पहिल्यांदा मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. केवळ काही वर्षांमध्ये अदानी ग्रीन कंपनीने कमाल कामगिरी केली आहे. पहिल्यांदा सूचीबद्ध झाला, तेव्हा तो २९.४५ रुपयांवर होता. आता १८ फेब्रुवारी २०२२ रोजी हा शेअर २१२८ रुपयांवर गेला आहे. आतापर्यंत अदानी ग्रीन कंपनीने तब्बल ७ हजार टक्क्यांचा परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात अदानी ग्रीन सर्वांत मोठी कंपनी आहे. 
 

Web Title: adani group adani green energy share multibagger stock investors got 7000 percent bumper return in just 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.