Join us

जाहिरातीला स्थगिती, आता गांगुलीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाबाबत अदानी ग्रुपने जाहीर केला मोठा निर्णय 

By बाळकृष्ण परब | Published: January 06, 2021 12:32 PM

saurav Ganguly News : सौरव गांगुलीला या जाहिरातीमधून हटवण्यात आल्याचे वृत्त आल्यानंतर अधानी समूहाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

ठळक मुद्देसौरव गांगुलीला या जाहिरातीमधून तात्पुरते हटवण्यात आले आहेआम्ही सौरव गांगुलीसह काम करत राहणार आहोतसौरव गांगुली हा आमचा ब्रँड अॅँबॅसेडर म्हणून कायम राहणार आहे

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर सौरव गांगुली करत असलेली फॉर्च्युन राइस ब्रान कुकिंग ऑइलची जाहिरात थांबवण्यात आली आहे. दरम्यान, सौरव गांगुलीला या जाहिरातीमधून हटवण्यात आल्याचे वृत्त आल्यानंतर अधानी समूहाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी विल्मरने सांगितले की, सौरव गांगुलीला या जाहिरातीमधून तात्पुरते हटवण्यात आले आहे. मात्र ही जाहिरात पुढे सुरू राहणार आहे. गांगुलीला प्रकृतीची समस्या निर्माण झाल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी असलेल्या अदानी विल्मरने  सौरव गांगुलीचा सहभाग असलेल्या आपल्या फॉर्च्युन राइस ब्रान कुकिंग ऑईलच्या सर्व जाहिराती मागे घेतल्या होत्या. त्यावरून विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. 

 सौरव गांगुलीला शनिवारी हृदयविकाराचा धक्का आला होता आणि त्याची अँजिओप्लास्टि करण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर या जाहिरातीची खिल्ली उडण्यास सुरुवात झाली होती. गांगुलीला गतवर्षी जानेवारीमध्ये फॉर्च्युन राइस ब्रॅन हॉर्ट हेल्दी ऑइलचे ब्रँड अॅम्बॅसेडर बनवण्यात आले होते. लॉकडाऊन दरम्यान गांगुली या जाहिरातीमध्ये हृदयाच्या काळजीला प्रोत्साहन देताना दिसत होता.  दरम्यान, गांगुलीला आलेला हृदयविकाराचा धक्का आणि त्यानंतर थांबवण्यात आलेल्या फॉर्च्युनच्या जाहिरातींबाबत प्रतिक्रिया देताना  अदानी विल्मरचे उपमुख्य कार्यकारी अंगशू मलिक यांनी सांगितले की, आम्ही सौरव गांगुलीसह काम करत राहणार आहोत. तसेच सौरव गांगुली हा आमचा ब्रँड अॅँबॅसेडर म्हणून कायम राहणार आहे. आम्ही आमच्या जाहिरातीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढे सौरव गांगुलीसह काम करू. ही एक दुर्दैवी घटना आहे. तसेच अशी घटना कुणाबरोबरही घडू शकते. यावेळी मलिक यांनी आपल्या कंपनीच्या तेलाचा बचावही केला. ते म्हणाले की, राइस ब्रान ऑइल हे काही औषध नाही आहे. हे केवळ कुकिंग ऑइल आहे. हृदयविकारासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यामध्ये खानपान आणि अनुवांशिक गोष्टीही कारणीभूत ठरू शकतात.  

टॅग्स :सौरभ गांगुलीव्यवसायभारतीय क्रिकेट संघ