Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट

Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 03:12 PM2023-03-28T15:12:32+5:302023-03-28T15:13:05+5:30

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Adani Group Another blow to Adani shares hit again lower circuit due to bse nse stock market decision adani green ndtv adani power | Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट

Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. खरेतर, NSE आणि BSE या प्रमुख एक्सचेंजेसनं अदानी ग्रीन एनर्जीला २८ मार्चपासून लाँग टर्म ॲडिशनल सर्व्हिलियन्स मेजरच्या दुसऱ्या टप्प्यात आणलं जाणार असल्याचं म्हटल होतं. हा निर्णय आजपासून लागू झाला आहे.

एक्सचेंजेसचे हे पाऊल अशा वेळी उचललं आहे जेव्हा समूहाचे दोन शेअर्स अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन शुक्रवारी दीर्घकालीन एएसएम फ्रेमवर्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या फेजमध्ये गेले. सुमारे १० दिवसांपूर्वी १७ मार्च रोजी, दोन्ही एक्सचेंजेसने अदानी ग्रीन एनर्जी आणि NDTV ला दीर्घकालीन ASM फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात ठेवलं होतं.

मोठी घसरण
तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आणखी घसरण झाली. दरम्यान, अदानी समूहाच्या सर्व १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये २७ मार्च रोजी शेअर बाजारात घसरण दिसून आली. तर २८ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत अदानी समूहाचे सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. दरम्यान, काही शेअर्समध्ये लोअर सर्किटही लावण्यात आले.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टपासून झटका
या वर्षी जानेवारीमध्ये यूएस-आधारित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. या अहवालात अदानी समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार असे अनेक आरोप करण्यात आलेत. मात्र, अदानी समूहाने हे आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले.

Web Title: Adani Group Another blow to Adani shares hit again lower circuit due to bse nse stock market decision adani green ndtv adani power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.