Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani Group: कोरोना संकटात बडे उद्योग कोसळले; अदानींनी खोऱ्याने पैसे कमवले, २ वर्षांत संपत्तीत १४ पट वाढ

Gautam Adani Group: कोरोना संकटात बडे उद्योग कोसळले; अदानींनी खोऱ्याने पैसे कमवले, २ वर्षांत संपत्तीत १४ पट वाढ

Gautam Adani Group: गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाने चौफेर विस्तार केला असून, सर्वच शेअर ३ महिन्यांपासून वधारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 10:07 PM2022-04-15T22:07:20+5:302022-04-15T22:08:37+5:30

Gautam Adani Group: गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाने चौफेर विस्तार केला असून, सर्वच शेअर ३ महिन्यांपासून वधारले आहेत.

adani group chief gautam adani wealth touches 121 billion dollars reach sixth position in forbes list | Gautam Adani Group: कोरोना संकटात बडे उद्योग कोसळले; अदानींनी खोऱ्याने पैसे कमवले, २ वर्षांत संपत्तीत १४ पट वाढ

Gautam Adani Group: कोरोना संकटात बडे उद्योग कोसळले; अदानींनी खोऱ्याने पैसे कमवले, २ वर्षांत संपत्तीत १४ पट वाढ

नवी दिल्ली: गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना संकटाने संपूर्ण देशाला चांगलाच तडाखा दिला आहे. या संकटाच्या कालावधीत भारतातील अनेक उद्योगांना घरघर लागली. लाखो नोकऱ्या गेल्या. मात्र, या कालावधीत गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपला जबरदस्त फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामतः गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन वर्षात तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

फोर्ब्स या संस्थेनुसार १५ एप्रिल २०२२ पर्यंत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२१.७ अब्ज डॉलर (भारतीय चलनात सुमारे ९३००० कोटी रुपये) इतकी वाढली आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीच गौतम अदानी आता सहाव्या स्थानावर विराजमान झाले आहेत. २०१७ मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५.८ अब्ज डॉलर इतकी होती. जगभरातील श्रीमंत गुंतवणूकदारांच्या यादीत ते २५० व्या स्थानावर होते. २०१८ मध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आणि एकूण संपत्तीचा आकडा ९.७ अब्ज डॉलरपर्यंत वाढला. २०२० आणि २०२१ मध्ये अदानी यांची घोडदौड कायम राहिली. 

कोरोना संकट काळात अदानी समूहाने चौफेर विस्तार

कोरोना संकट काळात अदानी समूहाने चौफेर विस्तार केला. याच काळात अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापनाचे हक्क मिळवले. ग्रीन एनर्जीबाबत अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचाच परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२१.७ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे.

अदानी समूहाचे सर्वच शेअर ३ महिन्यात वधारले

अदानी समूहाचे सर्वच शेअर मागील तीन महिन्यात वधारले आहेत. ज्यात अदानी एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट,अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी एंटरप्राइजेस, आणि अदानी ट्रान्समिशनचा या शेअरने दमदार कामगिरी केली आहे. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

दरम्यान, १९८० मध्ये मुंबईत हिरे व्यापारी म्हणून गौतम अदानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. विसाव्या वर्षी ते लखपती झाले. सन १९९७मध्ये अंडरवर्ल्ड डॉन फजलू अहमद याने अदानींचे अपहरण केले होते. हॉटेल ताजवर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी अदानी तेथे अडकले होते. अदानींनी शालेय शिक्षण अर्ध्यातच सोडले होते. 
 

Web Title: adani group chief gautam adani wealth touches 121 billion dollars reach sixth position in forbes list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी