Adani group stock: गौतम अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी पॉवरचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढून 275.05 रुपयांवर पोहोचले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअरची किंमत 5.65 टक्क्यांनी वाढून 273.15 रुपयांवर आली. अदानी पॉवरचे शेअर्स एका आठवड्यात जवळपास 15 टक्क्यांनी वाढले आहेत. मंगळवारी कामकाजादरम्यान यात किंचितशी घसरण होऊन ते 273 रुपयांवर आले.
शेअर्समधील तेजी पाहता 26 जुलै रोजी बीएसईनं अदानी पॉवरकडून यासंदर्भात उत्तर देण्यास सांगितलं होतं. बीएसईने मागितलेल्या स्पष्टीकरणाला कंपनीनं अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
३ ऑगस्टला बैठक
अदानी पॉवरनं बीएसईला दिलेल्या माहितीनुसारकंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. या बैठकीत कंपनीचे जून तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. मार्च तिमाहीत अदानी पॉवरचा नफा 4,645.47 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 13.13 कोटी रुपये होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 13,307.92 कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 6,902.01 कोटी रुपये होतं.
संपूर्ण आर्थिक वर्षाबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीचा नफा वाढून 4,911.58 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो वर्षभरापूर्वी 1,269.98 कोटी रुपये होता. कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून 31,686.47 कोटी रुपये झाले, जे वर्षभरापूर्वी 2020-21 मध्ये एकूण उत्पन्न 28,149.68 कोटी रुपये होतं.