सेबीचे माजी अध्यक्ष यूके सिन्हा आणि उद्योगपती दीपाली गोयंका(Dipali Goenka) यांची अदानी समूहाच्या मालकीच्या NDTV ने स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दोघांचा कार्यकाळ 27 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी असेल. नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटीच्या शिफारसीच्या आधाररे आणि शेअरधारक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्यात.
दीपाली गोयंका या वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपाली गोयंका या आशिया आणि भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहे. नुकताच मुंबईतील वरळी येथे देशातील सर्वात महागडा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. तो सुप्रसिद्ध उद्योगपती बीके गोयंका यांनी त्यांची पत्नी दीपाली गोयंका (Dipali Goenka Net Worth) यांच्या विकत घेतला होता. या घराची किंमत रतन टाटा यांच्या घरापेक्षा जास्त आहे.
मानसशास्त्रातील पदवीधर
दीपाली गोएंका या मानसशास्त्रात पदवीधर आहेत. त्या हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनी आहेत. दीपाली गोयंका यांनी वयाच्या 18 व्या वर्षी बीके गोयंकाशी विवाह केला. त्यांचे पती बीके गोयंका हे वेलस्पन ग्रुपचे चेअरमन आहेत. दीपाली गोयंका यांच्या लिंक्डइन अकाऊंटनुसार, त्या तिच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी ओळखल्या जाात. वेलस्पन ही जगातील सर्वात मोठ्या होम टेक्सटाईल कंपन्यांपैकी एक आहे. 2003 मध्ये दीपाली गोयंका यांनी स्पेसेस हा प्रीमियम बेड आणि बाथ ब्रँड लाँच केला होता.
दीपाली गोयंकांची नेटवर्थ
दिपाली गोयंका ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात. त्या सोशल मीडिया स्टारपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर त्याचे 191 के फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे, जर वेलस्पन ग्रुपबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे 25,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीचे उत्पन्न 2.3 अब्ज डॉलर्स आहे. बीके गोएंका यांनी मुंबईत खरेदी केलेले पहिले पेंटहाऊस सुमारे 240 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यात ते पत्नी दीपाली गोएंकासोबत राहणार आहेत.
थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीच्या 63 व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर बांधलेले हे पेंटहाऊस आता गोएंका दाम्पत्याचे नवीन घर आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 30,000 चौरस फूट आहे. दुसरीकडे, जर आपण रतन टाटा यांच्या घराबद्दल बोललो तर त्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे.