Adani Group: उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी याला एका दिग्गजाची साथ मिळाली आहे. अश्विनी गुप्ता, असे त्या दिग्गजाचे नाव आहे. गुप्ता यांची अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे (APSEZ) सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते निसान मोटर्सचे माजी ग्लोबल सीओओ होते. करण अदानी एमडीची म्हणून जबाबदारी पार पाडतील, तर अश्विनी गुप्ता सीईओ असतील.
ऑटोमोटिव्ह मार्केटचे दिग्गज असलेले अश्विनी गुप्ता यांची डिसेंबर 2019 मध्ये Nissan चे COO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जगभरात कंपनीच्या वाढीत त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांना ऑटोमोटिव्ह, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा जवळपास तीन दशकांचा अनुभव आहे. रेनॉल्ट निसान अलायन्समध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
काय म्हणाले करण अदानी?
APSEZ चे नवनियुक्त MD करण अदानी म्हणाले की, त्यांची नियुक्ती, हे पोर्ट क्षेत्रातील कंपनीचे स्थान मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे. आम्हाला खात्री आहे की, गुप्ता यांचे नेतृत्व कौशल्य आणि जागतिक कामगिरी कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अदानी पोर्ट सध्या श्रीलंका बंदरावर काम करत आहे. अदानी ग्रुपला या बंदरासाठी अमेरिकेच्या सरकारी संस्थेकडून निधी मिळाला आहे. अशा परिस्थितीत करण अदानी यांना एमडी बनवणे आणि अश्विनी गुप्ता यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करणे, अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
अदानी पोर्टचा शेअर विक्रमी पातळीवर
हिंडेनबर्ग अहवालानंतर, 2023 चे पहिले काही महिने अदानी पोर्टसाठी चांगले नसतील, परंतु त्यानंतर कंपनीने चांगला कमबॅक केला. अदानी पोर्ट ही समूहाची पहिली कंपनी होती, जिचे शेअर्स हिंडनबर्ग प्रभावातून सर्वाधिक बाहेर आले आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला. सध्या कंपनीचे शेअर्स विक्रमी पातळीवर आहेत. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.74 टक्क्यांच्या वाढीसह 1154.10 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टने गेल्या 6 महिन्यांत 60 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.