Join us

हिंडेनबर्ग तोंडावर आपटला! अदानी समूहाला मॉरिशसकडून क्लीन चिट, सर्व १० शेअर्स जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 4:08 PM

Hindenburg Report Adani Group: मॉरिशसकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आता अदानी समूहाच्या १० कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत.

Hindenburg Report Adani Group: हिंडेनबर्ग संस्थेने अहवाल प्रकाशित केल्यानंतर अदानी समूहाचे अगदी तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यावर मात करत आता अदानी समूह बऱ्यापैकी सावरताना दिसत आहे. अदानी समूह कर्जफेडीवर भर देत असून, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. अदानी समूहाला मॉरिशसकडून क्लीन चिट दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अदानी समूहाचे सर्व १० कंपन्यांचे शेअर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. 

हिंडेनबर्ग रिसर्चने मॉरिशसमध्ये त्यांच्या ‘शेल’ कंपन्यांच्या उपस्थितीबद्दल अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत, असं मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेन कुमार सेरुत्तून यांनी आपल्या देशाच्या संसदेत सांगितले. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आर्थिक सेवा मंत्री महेन कुमार सेरुत्तून यांनी सांगितले की, मॉरिशसस्थित संस्थांना मनी लाँड्रिंग आणि अदाणी समूहाच्या शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासाठी हिंडेनबर्गच्या आरोपाबद्दल काय म्हणायचे आहे, याविषयी एका खासदाराने लेखी विचारले होते. यावर, देशाचा कायदा शेल कंपन्यांना परवानगी देत ​​नाही. आतापर्यंत देशात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेले नाही.

अदानी समूहाचे शेअर्स तेजीत 

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ८८.५० रुपयांनी वाढून १९८०.७० वर व्यवहार करत आहेत. अदानी पोर्टबद्दल बोलायचे झाले तर, १८.४० रुपयांच्या वाढीसह ७०९.४५ वर व्यवहार करत आहे. अदानी पॉवरचा शेअर ४.४० रुपयांनी २४२.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी ट्रान्समिशनचा शेअर २२.२० रुपयांनी वाढून ९११.२० वर व्यवहार करत होता. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर १२.३० रुपयांनी ९१४.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. 

दरम्यान, अदानी टोटल गॅसचे शेअर्स १५.८५ रुपयांनी वाढून ८५१.९५ रुपयांवर व्यवहार करत होते. अदानी विल्मरचा शेअर ७.३५ रुपयांनी ३९६.३० रुपयांवर व्यवहार करत आहे. NDTV चा शेअर ५.४५ रुपयांनी वाढून १८४.८५ रुपयांवर व्यवहार करत आहे.  

टॅग्स :अदानीगौतम अदानी