Join us  

Virender Sehwag Adani Group : “गोऱ्या लोकांना आपली प्रगती पाहावत नाही,” अदानींसाठी विरेंद्र सेहवाग मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:26 PM

भारतीय बाजारपेठेतील प्रमुख समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाला हिंडनबर्गच्या अहवालानंतर मोठा धक्का बसला आहे.

भारतीय बाजारपेठेतील प्रमुख समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाला हिंडनबर्गच्या अहवालानंतर मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत समूह टॉप-2 मधून बाहेर पडला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणी विरोधक नरेंद्र मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारत आहेत. तर दुसरीकडे खुद्द अदानींना पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय बाजारपेठ आणि अदानी समूहातील भूकंपाच्या संदर्भात हिंडेनबर्गवर मोठा हल्लाबोल केला आहे. गोरे लोक भारताची प्रगती सहन करू शकत नाहीत, असे नाव न घेता तो म्हणाला. एवढेच नाही तर त्यांने या संपूर्ण प्रकरणाला सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. भारताची प्रगती गोर्‍या लोकांना सहन होत नाही. अशाप्रकारे भारतीय बाजारपेठेची पडझड हे एक चतुराईने रचलेले षडयंत्र दिसते, असे ट्वीट विरेंद्र सहवागने केले आहे.  

आपण कितीही प्रयत्न केले तरी भारत नेहमीप्रमाणेच मजबूत राहून यातून बाहेर पडेल. सेहवागचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल होऊ लागले. यावर सर्व चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी त्याच्या या ट्वीटला सहमतीही दर्शनवली आहे.

टॅग्स :गौतम अदानीविरेंद्र सेहवाग