Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group आणखी एका मोठ्या तयारीत; विदेशी बँकांचं ४१४२ कोटींचं कर्ज फेडणार, काय आहे प्लॅन?

Adani Group आणखी एका मोठ्या तयारीत; विदेशी बँकांचं ४१४२ कोटींचं कर्ज फेडणार, काय आहे प्लॅन?

ब्रिज लोन सुविधेची परतफेड करण्यासाठी अदानी समूहाची बँकांशी चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:01 PM2023-02-15T17:01:44+5:302023-02-15T17:03:27+5:30

ब्रिज लोन सुविधेची परतफेड करण्यासाठी अदानी समूहाची बँकांशी चर्चा सुरू आहे.

Adani Group in another big preparation 4142 crore bridge loan from foreign banks will be paid what is the plan share down adani enterises adani green adani power | Adani Group आणखी एका मोठ्या तयारीत; विदेशी बँकांचं ४१४२ कोटींचं कर्ज फेडणार, काय आहे प्लॅन?

Adani Group आणखी एका मोठ्या तयारीत; विदेशी बँकांचं ४१४२ कोटींचं कर्ज फेडणार, काय आहे प्लॅन?

होल्सिमच्या सिमेंट युनिट्समधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी घेतलेल्या 500 मिलियन डॉलर्सच्या ब्रिज लोन सुविधेची परतफेड करण्यासाठी अदानी समूहाची बँकांशी चर्चा सुरू आहे. ब्रिज लोनचा कालावधी सहा महिन्यांचा आहे आणि तो 5.25 बिलियन डॉलरच्या मोठ्या वित्तपुरवठा पॅकेजचा भाग होता, ज्यामध्ये 18 महिन्यांच्या कालावधीसह बिलियन डॉलर्सचे सीनिअर लोन, 24 महिन्यांच्या कालावधीसह 1 बिलियन डॉलर्सची मेझानाइन सुविधा आणि शेअर्सच्या मोबदल्यात 750 मिलियन डॉलर्सच्या कर्जाचा समावेश आहे.

तज्ञांच्या मते, शॉर्ट टर्म ब्रिज लोनची किंमत SOFR (Secured Overnight Financing Rate) पेक्षा 450 bps जास्त आहे आणि मार्चमध्ये मॅच्युअर होईल. ते म्हणाले की या महिन्यात ब्रिज कर्जाची रोखीने परतफेड करण्यासाठी समूह बार्कलेज बँक, डॉयचे बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसह सर्व लेंडर्सशी चर्चा करत आहे. बार्कलेज, डॉएचे बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड हे कर्जाचे अंडरराइटर होते तर DBS, MUFG, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प, फर्स्ट अबू धाबी बँक, इंटेसा आणि मिझुहो नंतर फायनॅन्सिंग कंसोर्टियममध्ये सामील झाले.

काय आहे प्लॅन?
अदानी समूह 3 बिलियन डॉलर्सच्या सीनिअर ट्रेच कंपोनंटला बदलण्याची योजना आखत होता. याचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. ज्यात ऑनशोर आणि ऑफशोर दोन्ही बँकांकडून लाँगटर्म फायनॅन्सची सुविधा आहे. तथापि, दीर्घ मुदतीच्या बाँड्स किंवा कर्जांसह सीनिअर ट्रेंचला रिफायनंस करण्याची योजना थांबवली जाऊ शकते. याबाबत अदानी समूहाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अदानी समूहाने सप्टेंबर 2022 मध्ये अंबुजा सिमेंट्स आणि ACC मधील Holcim चे स्टेक विकत घेतले. 30 अब्ज डॉलर्सचे अंदाजे कर्ज असलेला हा समूह चिंताग्रस्त गुंतवणूकदारांच्या शांततेसाठी मार्ग शोधत आहे.

Web Title: Adani Group in another big preparation 4142 crore bridge loan from foreign banks will be paid what is the plan share down adani enterises adani green adani power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.