आता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अदानी ग्रुपने मोठा प्लॅन तयार केला आहे. अदानी ग्रुप (Adani Group) पुढील आठवड्यात आशियात फिक्स्ड इनकम इनव्हेस्टर रोडशो करत आहे. लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, याच्याशी संबंधित एक व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून, अदानी ग्रुप 27 फेब्रुवारीला सिंगापूर आणि 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत हाँगकाँगमध्ये रोडशो करणार असल्याचे म्हटले आहे.
असा आहे रोडशोचा उद्देश -
इन्व्हेस्टर्सना आर्षित करणे आणि त्यांचा विश्वास वाढविण्यासाठी अदानी ग्रुप हा रोडशो करत आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी ग्रुपचे बॉन्ड्स आणि शेअर्स झपाट्याने घसरल्याचे दिसून आले. अदानी ग्रुपने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही इन्व्हेस्टर्ससोबत कॉलचे आयोजन केले होते. मुडीजच्या इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने या महिन्यात अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे आउटलुक कमी केले आहे.
एका महिन्यात 80% पर्यंत घसरले अदानी ग्रूपचे शेअर्स -
बार्कलेज, बीएनपी पारिबा एसए, डीबीएस बँक, डोयचे बँक एजी, एमिरेट्स एनबीडी कॅपिटल, आयएनजी, एमयूएफजी, मिझुहो, एसएमबीसी, निक्को आणि स्टँडर्ड चार्टर्डने संभाव्य इनवेस्टर्सना रोडशोसाठी इन्व्हिटेशन पाठवले आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. 24 जानेवारीपासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 80% पर्यंत घसरण झाली. दरम्यान, अदानी पॉवरने डीबी पॉवर लिमिटेड खरेदी करण्याचा करारही रद्द केली.