Join us

Adani In Bangladesh : बांगलादेशात अदानी समूह बॅकफुटवर, दिलं हे मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 7:26 PM

पाहा काय म्हटलंय समूहानं.

Adani Group Latest News:  गौतम अदानी समूहाच्या अदानी पॉवर या कंपनीने बांगलादेशला परवडणाऱ्या दरात वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. खरं तर, बांगलादेश सरकार संचालित पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने (PDB) या महिन्याच्या सुरुवातीला अदानी पॉवर लिमिटेड सोबत २०१७ च्या वीज खरेदी करारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. कोळशापासून निर्माण होणाऱ्या विजेची किंमत खूप महाग आहे, असा युक्तिवाद केला आहे.

अदानी समूह ग्रुप प्लांटसाठी त्याच किंमतीवर कोळसा आयात करेल, ज्या किंमतीवर बांगलादेशचा प्लांट आयात करत आहे. त्यात अदानी पॉवरने कोळशाच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यास सहमती दर्शवली आहे. याद्वारे बांगलादेशातील रामपाल आणि पायरा यांसारख्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांची किंमत जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रथम आलो वृत्तपत्राने अदानी पॉवरच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. बांगलादेशातील अदानी समूहाच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने प्रथम अॅलोला याबद्दल माहिती दिली. त्याचवेळी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

त्याचवेळी पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या (पीडीबी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अदानी पॉवरने बांगलादेशी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ५ सदस्यीय शिष्टमंडळ पाठवले आहे. २०१८ मध्ये एका अहवालात, यूएस-आधारित इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अॅनालिसिसने (IEEFA) अदानी प्रकल्प बांगलादेशसाठी खूप महाग आणि धोकादायक असल्याचे म्हटले होते. बांगलादेश सध्या भारताकडून १,१६० मेगावॅट वीज आयात करतो. तर, २०१७ च्या करारात २५ वर्षांसाठी अदानी पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदी करणे आणि मार्च महिन्यापासून वीज मिळणे सुरू होणार असल्याचे नमूद आहे. 

टॅग्स :अदानीबांगलादेश