Join us  

अदानी घोटाळा आरोपावर SEBI'ची मोठी घोषणा! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चौकशीचा अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:43 PM

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले. दरम्यान, या घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी भाजपवर आरोप केले. आता अदानी समुहाची चौकशी सेबी करणार आहे, या संदर्भातील अहवाल सेबी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सादर करणार आहेत. 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सतत चढ-उतार सुरू असताना, मोठी बातमी समोर येत आहे. बाजार नियामक सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) या आठवड्यात अदानी समूहाच्या 20,000 कोटी रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या चौकशीबाबत वित्त मंत्रालयाला एक अपडेट देईल. SEBI बोर्ड 15 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चौकशीचे अपडेट देईल. हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

हिंडनबर्गनं अदानी ग्रूपचं केलं मोठं नुकसान, कंपनी बॅकफूटवर; आता घ्यावा लागला मोठा निर्णय!

अदानी समूहाच्या समभागांच्या नुकत्याच झालेल्या घसरणीच्या वेळी नियामकाने घेतलेल्या निगराणीबाबत सेबी बोर्ड अर्थमंत्र्यांना माहिती देईल. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे बाजारमूल्यात 100 अब्ज डॉलर नुकसान झाले आहे. कंपनीच्या समभागांच्या घसरणीमुळे, समूहाने 20,000 कोटी रुपयांच्या त्यांच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा पूर्ण सदस्यता घेतलेला एफपीओ काढून घेतला होता.

हिंडनबर्गनं अदानी ग्रूपचं केलं मोठं नुकसान

गेल्या महिन्यात २४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये भूकंप आला होता. त्यामुळे कंपनीला दररोज कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये ११७ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. 

शेअर्स पडल्यानं गौतम अदानींच्या नेटवर्थमध्येही मोठी घट झाली आणि अदानी श्रीमंतांच्या यादीतून थेट टॉप-२० बाहेर फेकले गेले आहेत. ब्लूमबगच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रूपनं पुढील आर्थिक वर्षासाठी आपलं रेवेन्यू टार्गेट पूर्वलक्ष्यीत अंदाजाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी केलं असून थेट १५ ते २० टक्क्यांवर आणलं आहे. 

तारण शेअर्स सोडवण्याचा प्लान

हिंडनबर्गच्या वादळानंतर अदानी ग्रूपनं मोठं प्लानिंग केलं आहे. यात कर्जाची परतफेड, रोख बचत, कॅपिटल एक्स्पेंडिचर प्लानमध्ये घट आणि तारण ठेवलेल्या शेअर्सची सुटका करणे अशा मार्गांचा अवलंब केला जात आहे. .रिपोर्टनुसार अदानी ग्रूपच्या तीन कंपन्यांनी बँकांकडे आपले अतिरिक्त शेअर्स तारण ठेवले आहेत. ते सोडवण्याचा प्लान कंपनीनं तयार केला आहे. तारण ठेवलेल्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय