मुंबई : वीजनिर्मिती, कोळसा आयात, खाद्यतेल शुद्धीकरण, बंदरे अशा बलाढ्य क्षेत्रात कार्यरत अदानी समूह आता मशीन गन, कार्बाइन व छोटी शस्त्रात्रे बनविणार आहे. समूहातील सूत्रांनी सांगितले की, समूहाने इस्रायलच्या इस्रायल वेपन इंडस्ट्रिजच्या भागीदारीत ग्वाल्हेर येथील छोटी शस्त्रास्त्रे तयार करणारी कंपनी अलीकडेच विकत घेतली. अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसने हे अधिग्रहण केले.
ग्वाल्हेरची ही कंपनी मार्च, २०१७ मध्ये सुरू झाली व ती छोटी शस्त्रास्त्रे तयार करणारी पहिली खासगी भारतीय कंपनी होती. यात भारतीय सेना वापरत असलेल्या टेव्होर राजफल्स, एक्स-९५ असॉल्ट रायफल्स, निगेव्ह मशीन गन व उझी सब मशीन गनचे उत्पादन होत आहे. अदानी समूहाने अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीचा हैदराबाद येथील प्रकल्प अधिग्रहीत केला आहे. ही कंपनी लवकरच भारतीय नौदलाच्या हेलीकॉप्टर व पाणबुडीसाठी मागविलेल्या निविदांमध्ये भाग घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अदानी समूह बनविणार मशीन गन्स, कार्बाइन्स
वीजनिर्मिती, कोळसा आयात, खाद्यतेल शुद्धीकरण, बंदरे अशा बलाढ्य क्षेत्रात कार्यरत अदानी समूह आता मशीन गन, कार्बाइन व छोटी शस्त्रात्रे बनविणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:18 AM2020-01-09T03:18:35+5:302020-01-09T06:57:59+5:30