अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणी एसबीआय आणि एलआयसीने त्यांचे निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, अदानी समूहामध्ये एसबीआय आणि एलआयसीचे एक्सपोजर मर्यादेत राहिले आहे. यावेळी त्यांनी मार्केट रेग्युलेटर्सचेही कौतुक केले. “गव्हर्नन्सबाबत नियमाक अतिशय कठोर आहेत. नियामकांनी बाजार मजबूत ठेवला आहे,” असंही त्या म्हणाल्या.
“या संदर्भात एलआयसी आणि एसबीआयकडून तपशीलवार निवेदन आले आहे. यामध्ये त्यांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आपल्या एक्सपोजरबाबत माहिती सर्वांसमोर ठेवली आहे,” असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. नेटवर्क १८ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी अदानी समूह प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी आणि एसबीआयकडे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मर्यादित एक्सपोजर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एलआयसी आणि एसबीआयचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांनी त्यात मर्यादित गुंतवणूक केली होती. एलआयसी आणि एसबीआयच्या उच्च अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे की, या समूहात निर्माण झालेल्या गोंधळाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांची गुंतवणूक यात मर्यादित होती आणि जी काही गुंतवणूक झाली त्याचा फायदा त्यांच्या कंपन्यांना किंवा बँकेला झाला आहे.
रेग्युलेटर्सचं काम चांगलं
“अर्थसंकल्पानंतर लगेचच इतर काही कारणांमुळे शेअर बाजारात झाली. पण आमचा विश्वास आहे की बाजार नियंत्रक खूप चांगले काम करत आहेत. आता हळूहळू परिस्थिती सुधारेल. या सर्व बाबींमध्ये सुधारणा झाल्यानंतर आणखी काही दिवसांनी बाजार पुन्हा स्थिरावल्याचे दिसून येईल. बाजार नियंत्रक अतिशय कठोर आहेत. भविष्यातही बाजार मजबूत ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील. केवळ नियामकांमुळेच बाजारपेठा चांगल्या स्थितीत आहेत,” असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.