HLL Privatisation: एअर इंडियानंतर मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीच्या विक्रीची तयारी केली आहे. लवकरच एचएलएल लाईफकेअरची (HLL Lifecare) जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपवली जाणार आहे. दरम्यान, सरकार HLL Lifecare Limited मधील आपला संपूर्ण हिस्सा विकत आहे आणि आता ही कंपनी धोरणात्मक निर्गुंतवणूकीअंतर्गत खाजगी कंपनीच्या हाती जाईल.
लाईव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार एचएलएल लाईफकेअर (HLL Lifecare) या सरकारी कंपनीच्या खरेदीसाठी अदानी समुह (Adani Group) आणि पीरामल हेल्थकेअर (Piramal Healthcare) या कंपन्या शर्यतीत असल्याचं सांगण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार लवकरच पीरामल ग्रुप, अदानी ग्रुप, अपोलो ग्रुप आणि मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Meil) यांच्यासह अन्य बोलीदारांकडून निविदा मागवणार आहे.
मूल्यांकनाची प्रक्रिया सुरूसध्या ड्यू डिलिजन्स सुरू आहे आणि विजेत्याच्या निवडीची प्रक्रिया आर्थिक बोलींवर आधारित असेल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवहार सल्लागार त्यांचे मूल्यांकन करत आहेत आणि प्रक्रिया (आर्थिक बोली प्राप्त करण्याची) लवकरच सुरू होईल. अदानी ग्रुप, पिरामल ग्रुप यांनी एचएलएल खरेदी करण्यात रस दाखवला आहे. १०० टक्के हिस्स्याची विक्रीDIPAM ने १४ डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमामधील सरकारच्या १०० टक्के हिस्स्याच्या विक्रीसाठी प्रारंभिक निविदा मागवल्या होत्या. EOI सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी होती, जी नंतर २८ फेब्रुवारी आणि नंतर १४ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. एचएलएल लाइफकेअर हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.