भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी सध्या आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या विकल्याच्या मार्गावर आहेत. रिलायन्स कॅपिटलसाठी दोनदा बोली लावल्या आहेत, तर त्यांचा एक पॉवर प्लांट विकण्याची तयारीही करण्यात आली आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड असे या पॉवर प्लांटचे नाव असून ते खरेदी करण्याच्या शर्यतीत गौतम अदानीही सामील असल्याचे समजते. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) चा लिलाव केला जात आहे, ज्यामध्ये अदानी समूह देखील सहभागी होऊ शकतो.
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर!
एका अहवालानुसार, अनिल अंबानींची ही कंपनी गौतम अदानी विकत घेऊ शकतात ज्याचा लिलाव होत असून त्यासाठी बोली लावण्याची तयारी सुरू आहे. या वर्षाच्या २०२३ च्या सुरुवातीला अदानी समूहाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. हिंडेनबर्गचा रिसर्च अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती, आता त्यांचे पुनरागमन दिसत आहे आणि समूह नवीन सौद्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. या क्रमाने, अदानी समूह आपल्या जीवाश्म इंधनाशी संबंधित प्रमुख प्रकल्पांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे.
अहवालानुसार, गौतम अदानी अनिल अंबानींच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्प विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडवर बोली लावू शकतात. या दोन प्लांट्समधून मध्य भारतात ६०० मेगावॅट निर्मिती सुविधा चालवते. VIPL चे प्रवर्तक अनिल अंबानी नियंत्रित रिलायन्स पॉवर आहेत. अदानी यांना त्यांच्या योजनेत कठोर स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो, कारण मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर लिमिटेड देखील या लिलावात सहभागी होऊ शकते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर सावरल्यानंतर गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत निधी उभारणी आणि गुंतवणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले जात आहे.
अहवालानुसार, जर अदानी समूह ही बोली जिंकण्यात यशस्वी ठरला, तर त्यांच्या कोळसा ऊर्जा प्रकल्पांची क्षमता आणखी वाढेल. विदर्भ इंडस्ट्रीजच्या कर्जदारांनी कर्ज निराकरण प्रक्रिया आयोजित करण्यासाठी SBI Caps ची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी, कंपनीला सावकारांकडून ३ निविदा प्राप्त झाल्या आहेत.