अदानी समूहाच्या कंपन्यांनी नवीन कर्जासाठी नव्हे तर टॉप-अप म्हणून शेअर्स तारण ठेवले आहेत. SBICap ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार अदानी समूहाच्या कंपन्यांनी सुरक्षा कव्हरेज राखण्यासाठी आवश्यक टॉप-अप म्हणून हे शेअर्स तारण ठेवले आहेत. SBICAP ट्रस्टींनी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. माहितीनुसार, SBI कॅप ट्रस्टीने अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स तारण ठेवले आहेत. SBICAP ट्रस्टी ही SBI ची उपकंपनी आहे. अशा प्रकारे, आता अदानी ग्रीनचे 1.06 टक्के, अदानी पोर्टचे 1.00 टक्के आणि अदानी ट्रान्समिशनचे 0.55 टक्के तारण आहेत.
कोणत्या प्रकल्पासाठी ठेवले तारण?
एसबीआय कॅप ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार, अदानी समूहाने हे कर्ज कारमाइकल माईन (Carmichael Mine) विकसित करण्यासाठी घेतले आहे. तथापि, या कर्जासाठी समूहाला 140 टक्के मार्जिन ठेवणे आवश्यक आहे. अदानी समूहाचे शेअर्स सध्या चांगले काम करत नसल्यामुळे, SBICAP ट्रस्टींनी आपली भूमिका स्पष्ट करत कार्माइकल प्रकल्प कार्यरत आहे आणि कमाई करत असल्याचे म्हटले आहे. ट्रस्टीच्या मते, यांचे सर्व एक्सपोजर प्रोजेक्ट्सची संपत्तीतून होणाऱ्या EBITDA द्वारे सुरक्षित केले जातात. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत कोणतेही आव्हान नाही कारण समूह पुरेसा मजबूत आहे आणि त्याचा रोख प्रवाह अतिरिक्त असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
सरकार समिती नेमणारअमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले. अदानी समूहाचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले. स्टेट बँक आणि एलआयसीला तोटा सहन करावा लागला. यानंतर संसदेतही हा विषय विरोधकांनी लावून धरला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीवेळी अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.