Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पुन्हा आमने-सामने आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:56 AM2023-01-03T09:56:17+5:302023-01-03T09:56:46+5:30

देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पुन्हा आमने-सामने आले आहेत.

adani-group-reliance-industries-ntpc-among-7-bidders-for-sks-power-see-full-detail | अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

Adani Vs Ambani: देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पुन्हा आमने-सामने आले आहेत. प्रत्यक्षात दोघेही वीज कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. तसे पाहता या दोघांशिवाय आणखी पाच कंपन्यांनी या कंपनीसाठी बोली लावली असली तरी सर्वांच्या नजरा या दोन्ही व्यावसायिकांच्या कंपनीवर खिळल्या आहेत. ज्या कंपनीसाठी ७ व्यावसायिक ग्रुप स्पर्धा करत आहेत त्याचे नाव एसकेएस पॉवर जनरेशन (SKS Power Generation) आहे. छत्तीसगडस्थित वीज कंपनीकडे बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन कर्जदारांचे १,८९० कोटी रुपये देणे आहे.

या प्रक्रियेची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्हाला निविदा प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांचे मूल्यांकन केले जात आहे. बिड्सच्या आर्थिक मापदंडांवर आता चर्चा केली जाईल आणि एक कंपनी निवडण्यापूर्वी कर्जदाता बोलीदारांकडून अधिक तपशील मागू शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, सरकारी मालकीची एनटीपीसी, टोरेंट पॉवर, जिंदाल पॉवर, शारदा एनर्जी अँड मिनरल्स आणि सिंगापूरस्थित व्हँटेज पॉइंट ॲसेट मॅनेजमेंट यांनी अडचणीत सापडलेली कंपनी विकत घेण्यासाठी अंतिम निविदा सादर केल्या आहेत, असे त्या व्यक्तीने सांगितले. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर होती.

चार वेळा मुदतवाढ
काहींनी अधिक वेळ मागितल्यानंतर अंतिम बोली जमा करण्यासाठी चार वेळा डेडलाईन वाढवण्यात आली होती. एनटीपीसीने विस्तारासाठी त्यांचे बोर्ड आणि सरकार या दोघांकडूनही मान्यता घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. SKS ची कॉर्पोरेट दिवाळखोरी आणि निराकरण प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली.

Web Title: adani-group-reliance-industries-ntpc-among-7-bidders-for-sks-power-see-full-detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.