Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

Adani Group : अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत (SLPA) वेस्टर्न कंटेनर टर्मिनल ( Western Container Terminal) विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 07:01 PM2021-10-02T19:01:30+5:302021-10-02T19:03:15+5:30

Adani Group : अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत (SLPA) वेस्टर्न कंटेनर टर्मिनल ( Western Container Terminal) विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला.

adani group seals deal to develop western container terminal at strategically important colombo port | श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

अदानी ग्रुपची (Adani Group) प्रमुख कंपनी अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोने (Adani Port and Special Economic Zone (APSEZ) श्रीलंकेत मोठा करार केला आहे. कंपनीला अशा एका बंदराचा विकास आणि ऑपरेट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जी चीनच्या विरुद्ध सामरिक दृष्टिकोनातून देखील खूप महत्वाची आहे. (adani group seals deal to develop western container terminal at strategically important colombo port)

अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत (SLPA) वेस्टर्न कंटेनर टर्मिनल ( Western Container Terminal) विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला. यासह APSEZ श्रीलंकेतील बंदर टर्मिनलची जबाबदारी स्वीकारणारी पहिली भारतीय कंपनी बनली. हे टर्मिनल श्रीलंकेतील कोलंबो बंदरात आहे.

वेस्टर्न कंटेनर टर्मिनलमध्ये (WCT)अदानी ग्रुपचा 51% हिस्सा असेल. APSEZ स्थानिक कंपनी जॉन कील्स होल्डिंग्ज आणि SLPA च्या सहकार्याने बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफरच्या (BOT)आधारावर टर्मिनल विकसित करेल. या प्रकल्पात स्थानिक भागीदारांची अनुक्रमे 34 टक्के आणि 15 टक्के भागीदारी असेल.

श्रीलंकेच्या कोलंबो बंदराचा भारतीय कंटेनर आणि मुख्य जहाज जहाज चालकांसाठी खूप उपयोग आहे. ट्रान्सशिपमेंटसाठी ही त्याची पहिली पसंती आहे. याशिवाय, भारत आणि जपानसह चार देशांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता हस्तक्षेप मर्यादित करण्यासाठी  Quad ग्रुपची स्थापना केली आहे. या बैठकीत बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते. या ग्रुपमध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. अशा स्थितीत केवळ श्रीलंकेच्या या बंदरालाही सामरिक महत्त्व आहे.

चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी 'बेल्ट अँड रोड' उपक्रमाचा भाग म्हणून श्रीलंकेतील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये चीनने 8 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 594 अब्ज रुपये) गुंतवले आहेत. कोलंबोने कर्जाची अदला बदली म्हणून 2017 मध्ये आपले हंबनटोटा बंदर बीजिंगला दिले होते.

Web Title: adani group seals deal to develop western container terminal at strategically important colombo port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.