अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचें (AEL) कव्हरेज सुरू केले आहे. जेफरीजने अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. कंपनीचं बिझनेस प्रॉस्पेक्ट्स अतिशय मजबूत असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
जेफरीजनं अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सना 3800 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 3245.65 रुपयांवर पोहोचले.
ब्रोकरेज हाऊसनं काय म्हटलं?
अदानी एंटरप्रायझेसचे व्यवसाय उद्योग प्रमुख म्हणून उदयास येऊ शकतात, असं जेफरीजनं म्हटलंय. विमानतळ आणि ग्रीन हायड्रोजनच्या नवीन व्यवसायासह, ब्रोकरेज हाऊसला आर्थिक वर्ष 2026 मध्ये अदानी एंटरप्रायझेसचा कन्सोलिडेटेड ऑपरेटिंग प्रॉफिट दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2028 मध्ये त्यात 3 पट वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ब्रोकरेज हाऊसनं आपल्या अहवालात म्हटलंय आहे की ग्रीन हायड्रोजन, विमानतळ, डेटा सेंटर, रस्ते, कॉपर यांसारखे नवीन व्यवसाय भविष्यात इंडस्ट्री लीडर्स म्हणून उदयास येतील.
वर्षभरात 85 टक्क्यांची वाढ
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका वर्षात 85 टक्क्यांनी वाढले आहेत. 14 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रुप कंपनीचे शेअर्स 1750.30 रुपयांवर होते. 14 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 3245.65 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 वर्षात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2580 टक्क्यांनी वाढले. 15 फेब्रुवारी 2019 रोजी कंपनीचे शेअर्स 119.65 रुपयांवर होते. जर आपण गेल्या 10 वर्षाबद्दल बोललो तर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 13000 टक्क्यांची जबरदस्त वाढ झालीये.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)