Join us

Adani Group Share Adani Power : अदानी समुहाचा 'हा' शेअर पोहोचला विक्रमी पातळीवर, झाला ४ हजार कोटींपेक्षा अधिक नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 2:57 PM

Adani Group Share Adani Power : पाहा काय आहे यामागचं कारण. गुंतवणूकदार झाले मालामाल. यावर्षी आतापर्यंत शेअर्सच्या किंमतीत २३७ टक्क्यांची झाली वाढ.

Adani Group Share Adani Power : अदानी समूहाच्या एका शेअरने गुरूवारी विक्रमी उच्चांक गाठला आहे. हा मल्टीबॅगर शेअर अदानी पॉवरचा (Adani Power) आहे. अदानी पॉवरच्या शेअरने गुरुवारी मुंबई शेअर बाजारावर (BSE) 354 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ही तेजी जून 2022 च्या तिमाहीत नफ्यात मोठी वाढ झाल्यानंतर आली. एप्रिल-जून 2022 या तिमाहीत अदानी पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून 4,779.8 कोटी रुपये इतका झाला आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत नफा 278 कोटी रुपये होता.

अदानी पॉवरचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 237 टक्क्यांपेक्षा क्जास्त वाढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी अदानी पॉवरचे शेअर्स 101.30 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स सध्या 4 ऑगस्ट 2022 रोजी BSE वर 346 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 280 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात बीएसईवर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

एप्रिल जून 2022 तिमाहित अदानी पॉवरचा एकूण महसूल 15,509 कोटी रूपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 7,213 कोटी रूपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत अदानी पॉवरच्या एबिटडामध्ये 227 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टॅग्स :अदानीशेअर बाजार