Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group Share : गौतम अदानींचा जबरदस्त कमबॅक; एका दिवसात कमावले तब्बल 3,30,32,32,00,000 रुपये

Adani Group Share : गौतम अदानींचा जबरदस्त कमबॅक; एका दिवसात कमावले तब्बल 3,30,32,32,00,000 रुपये

Adani Group Share : हिडेंनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला, पण आता ते हळूहळू यातून सावरत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:46 PM2023-03-01T15:46:18+5:302023-03-01T15:46:34+5:30

Adani Group Share : हिडेंनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला, पण आता ते हळूहळू यातून सावरत आहेत.

Adani Group Share : Gautam Adani's tremendous comeback; 3,30,32,32,00,000 earned in one day | Adani Group Share : गौतम अदानींचा जबरदस्त कमबॅक; एका दिवसात कमावले तब्बल 3,30,32,32,00,000 रुपये

Adani Group Share : गौतम अदानींचा जबरदस्त कमबॅक; एका दिवसात कमावले तब्बल 3,30,32,32,00,000 रुपये

Adani Group Share : मागील काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर मंगळवारी मोठी रिकव्हरी दिसून आली. आज(बुधवार) अदानी समूहाचे शेअर्स दुपारी 2 च्या सुमारास 1500 रुपयांपेक्षा जास्त दराने व्यवहार करताना दिसले. अदानी समूहाचे शेअर्स इतक्या वेगाने वाढले की, अदानींनी एका दिवसात सुमारे 3,30,32,32,00,000 रुपये कमावले. विशेष म्हणजे, इलॉन मस्कही एका दिवसात इतके पैसे कमवू शकले नाहीत. अदानी समूहाची ही स्थिती पाहता आता अदानी समूह हिंडनबर्गच्या सुनामीतून हळूहळू बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.

अदानी समूहाबाबत अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या नकारात्मक अहवालानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली. यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्स 80 ते 85 टक्क्यांनी घसरले. अदानीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप 140 बिलियन डॉलरपर्यंत घसरले होते, पण आता अदानींचे शेअर्स पुन्हा वाढू लागले आहेत. हिंडेनबर्गच्या सुनामीत बुडालेला अदानी ग्रुप आता बाहेर येत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी अदानींने जबरदस्त पुनरागमन करत श्रीमंतांच्या यादीत उंच झेप घेतली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत सतत घसरण करणारे गौतम अदानी आजचे टॉप गेनर बनले आहेत. दुपारी एकच्या सुमारास गौतम अदानी या यादीत अव्वल विजेते ठरले. या यादीत जिथे अदानी अव्वल स्थानावर राहिले, तिथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आणि टेस्ला, ट्विटरचे मालक इलॉन मस्क टॉप लूजर्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मस्क दुसऱ्या क्रमांकावर 
बर्नार्ड अर्नॉल्ट आजचे टॉप लूझर आहे. त्यांनी काही तासांत $1.5 अब्ज संपत्ती गमावली. तरीही ते श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, इलॉन मस्क यांनी 1.2 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली आहे. मस्क आज 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 

Web Title: Adani Group Share : Gautam Adani's tremendous comeback; 3,30,32,32,00,000 earned in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.