Join us

अमेरिकेतून बातमी आली अन् Adani ग्रुपचे शेअर्स कोसळले; संपूर्ण आठवडा ठरला वाईट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 4:15 PM

Adani Group Shares: अदानी ग्रुपच्या लिस्डेट सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये डाउनफॉल पाहायला मिळत आहे.

Adani Group Shares:अदानी ग्रुपच्या शेअर्ससाठी हा आठवडा चांगला गेला नाही. या आठवड्यात शेअर बाजाराने विक्रमी तेजी नोंदवली. पण त्याचा फायदा अदानी समूहाच्या शेअर्सवर दिसला नाही. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्सवर खूप दबाव दिसत आहे. शुक्रवारच्या व्यवहारात अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 10 टक्क्यांपर्यंत घसरले.

अमेरिकेतून आलेल्या एका बातमीचा परिणाम अदानी ग्रुपच्या शेअर्सवर दिसला. अमेरिकेतून बातमी आली की, अदानी समूह अमेरिकन गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या वतीने अमेरिकन गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यास सांगितले गेलेले प्रकरण अमेरिकन अधिकारी पाहतील. या वृत्तानंतर शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्सना फटका बसला.

काय आहे शेअर्सची स्थिती शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात बातमी लिहिपर्यंत अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 6.45 टक्क्यांची घसरण झाली. तसेच, अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण होत आहे. अदानी विल्मरबद्दल बोलायचे तर इथेही डाऊनफॉल पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुपची आणखी एक मोठी कंपनी, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये 5.42 टक्क्यांची मोठी घसरण होत आहे. 

10 पैकी 10 शेअर्स लाल चिन्हात शुक्रवारी अमेरिकेच्या बातमीने अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव वाढला. आज सकाळच्या व्यवहारात अदानी समूहाच्या लिस्ट 10 मधील 10 शेअर्स बाजारात लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले. अदानी एंटरप्रायझेस असो किंवा एनडीटीव्ही, सकाळच्या ट्रेडिंग सत्रात प्रत्येक शेअर निगेटिव्ह झोनमध्ये होता.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजारशेअर बाजार