Join us  

LICची Adani Groupमधील ३० हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात; किती झाले नुकसान? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:18 PM

LIC Investment In Adani Group: अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरत असून, त्याचा फटका एलआयसीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LIC Investment In Adani Group: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागत आहे. यातून कंपनी अद्यापही सावरलेली दिसत नाही. एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरत असून, दुसरीकडे मोठ्या डील्स हातातून निसटून जात आहेत. यातच आता भारतीय आयुर्विमा मंडळ म्हणजेच LIC ची अदानी समूहातील ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. 

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीने अदानी समूहाच्या दहा कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. २४ जानेवारी रोजी या गुंतवणूकीची किंमत ८१,२६८ कोटी रुपये होती. परंतु आता ती ३३,१४९ कोटी रुपये झाल्याचे सांगितले जात आहे. जर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घट होण्याची प्रक्रिया अशाच प्रकारे चालू राहिली तर एलआयसीला मोठा तोटा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

एलआयसीने अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक

डिसेंबरच्या तिमाहीच्या भागधारक पॅटर्ननुसार एलआयसीने अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये एसीसी, अदानी उपक्रम, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी बंदरे, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अंबुजा सिमेंट्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे, अदानी समूहाने DB पॉवर खरेदी करण्याचा करार पूर्ण केला नाही. तसेच PTC India साठी बोली लावण्यापासून ते मागे हटले. आता सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंटने अदानी पॉवर कंपनीशी होत असलेला करार रद्द केला आहे. 

दरम्यान, दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने अदानी समूह चांगलाच हादरला आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाचे मार्केट कॅप १४२ अब्ज डॉलरने घसरले आहे. आता त्यांचे लक्ष पूर्णपणे रोख बचत आणि कर्ज कमी करण्यावर आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप ६० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एलआयसीअदानीशेअर बाजार