अदानी समुहाच्या शेअरने आज मोठी झेप घेतली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर या समभागांमध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड : हा शेअर १.४० टक्क्यांच्या वाढीसह २,४०९.३० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या शेअरची किंमत २,३७६.१० रुपयांवर व्यवहार करत होता.
लवकरच मिळणार सहाराच्या गुंतवणूकदारांना पैसे, लाँच होणार रिफंड पोर्टल
अदानी ग्रीन एनर्जी शेअर किंमत- हा शेअर ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह ९६६.८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या समभागाची किंमत ९६५.२० रुपयांच्या पातळीवर होती.
अदानी ट्रान्समिशन शेअर किंमत: हा शेअर १.९८ टक्क्यांच्या वाढीसह ७५७.४० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या शेअरची किंमत ७४२.३० रुपयांच्या पातळीवर होती.
अदानी टोटल गॅस लिमिटेड : हा शेअर १.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६४५.०५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या समभागाची किंमत ६३३.९० रुपयांच्या पातळीवर होती.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन : हा शेअर एक टक्क्याच्या उसळीसह ७३३.३५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या समभागाची किंमत ७२६.१० रुपयांच्या पातळीवर होती.
अदानी पॉवर शेअर किंमत: हा शेअर १.०३ टक्क्यांच्या वाढीसह २४४.४० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात समभागाची किंमत २४१.९० टक्क्यांच्या पातळीवर होती.
अदानी विल्मर शेअरची किंमत: शेअर १.१० टक्क्यांच्या वाढीसह ४०३.१० रुपयांवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या समभागाची किंमत ३९८.७० रुपयांच्या पातळीवर होती.
अंबुजा सिमेंट शेअरची किंमत: हा शेअर ०.०६० टक्क्यांच्या वाढीसह ४१६.८५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
ACC सिमेंट्स: शेअर १.९० टक्क्यांच्या वाढीसह १,८११.३५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात या समभागाची किंमत १,७७७.५० रुपयांच्या पातळीवर होती.
NDTV : हा शेअर ३.८५ टक्क्यांच्या वाढीसह २३१.८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.