Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी समूहाच्या लिस्टेड शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळत आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर २० टक्क्यांच्या घसरणीसह उघडला आणि या शेअरला लोअर सर्किट लागलं.
समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १० टक्क्यांनी घसरून २५३९ रुपयांवर आला असून या शेअरलाही लोअर सर्किट लागलं. अदानी पोर्ट्समध्ये १० टक्के, अंबुजा सिमेंटमध्ये १० टक्के, अदानी पॉवरमध्ये १६ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण
गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून आली. समूहातील सर्व १० सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग पुरामुळे घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २० टक्क्यांनी घसरून ६९७.७० रुपयांवर आला आणि या शेअरला लोअर सर्किट लागलं. अदानी टोटल गॅसचा शेअर १४ टक्क्यांनी घसरून ५७७.८० रुपये, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर १८ टक्क्यांनी घसरून १,१५९ रुपये, एसीसीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून १,९६६.५५ रुपयांवर आला. अंबुजा सिमेंटमध्येही १० टक्क्यांची घसरण झाली असून या शेअरला लोअर सर्किट लागलं.
अदानी पोर्ट्स अँड सेझचा शेअरही १० टक्क्यांनी घसरून १,१६० रुपयांवर, अदानी विल्मरचा शेअर ८ टक्क्यांनी घसरून ३०१ रुपयांवर बंद आला. तर दुसरीकडे एनडीटीव्हीचा शेअर ९.९४ टक्क्यांनी घसरून १५२.०२ रुपयांवर आला. अदानी पॉवरचा शेअर १५.३४ टक्क्यांनी घसरून ४४३.७० रुपयांवर आला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १० टक्क्यांनी घसरून २५३९ रुपयांवर आला असून या शेअरलाही लोअर सर्किट लागलं.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)