अदानी ग्रुपच्या दोन शेअर्संनी आज बुधवारी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा केला आहे. दोन्ही शेअर्संनी मोठी उडी घेतली आहे. अदानी एंटप्राइजेस आणि अदानी पोर्ट्सचे आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर आहेत, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स ५% उच्चांकीवर आहे. अदानी पोर्ट्सचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये ५% वाढीसह ९०० रुपयांवर आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे २% वाढून ४,०१५ रुपयांवर आहेत. (Adani Group Stock)
Adani Enterprises Ltd
अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे. अदानी एंटरप्राइजसचे शेअर २ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकीवर असून, शेअर ४,०४७.२५ रुपयांवर पोहोचला आहे. याची मार्केट कॅप ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत (Q2FY23), अदानी एंटरप्रायझेसचा एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढून ४६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीचा एकत्रित महसूल देखील वर्षानुवर्षे जवळपास तीन पटीने वाढून ३८,१७५ कोटी रुपये झाला आहे.
“१० हजार अंबानी, २० हजार अदानी घडतील तेव्हाच भारत विकसित होईल”
Adani Ports
अदानी (Adani) पोर्ट्सचे शेअर्स ४.९५% पर्यंत ८९५.२५ रुपयांवर आहेत. शेअर्सने सुरुवातीला ९००.७५ रुपयांचा उच्चांक गाठला. या शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९८७.९० रुपयांच्या जवळ आहे. याची मार्केट कॅप १,८९,१४१.९० कोटी रुपये आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ६८.५ टक्क्यांनी वाढून १६७७.४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.