Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी

Mutual Fund investment in Adani Group Stocks: अदानी समूहाच्या दहा कंपन्या देशांतर्गत शेअर बाजारात लिस्टेड आहेत. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी ८ कंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:32 AM2024-08-20T10:32:04+5:302024-08-20T10:32:41+5:30

Mutual Fund investment in Adani Group Stocks: अदानी समूहाच्या दहा कंपन्या देशांतर्गत शेअर बाजारात लिस्टेड आहेत. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी ८ कंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक केली होती.

Adani Group Stocks Mutual Funds Investing in Adani Group Shares Most Buys Made in adani ports Stock | Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी

Mutual Fund investment in Adani Group Stocks: अदानी समूहाच्या दहा कंपन्या देशांतर्गत शेअर बाजारात लिस्टेड आहेत. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी ८ कंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक केली होती. त्याचवेळी समूहातील अंबुजा सिमेंट या कंपनीत हलकी विक्री झाली. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून म्युच्युअल फंडांच्या खरेदीत सातत्यानं वाढ होत आहे. जूनमध्ये म्युच्युअल फंडांनी ९९० कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली होती, तर मे महिन्यात हा आकडा ८८० कोटी रुपये होता. जुलैअखेर अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांमधील म्युच्युअल फंडांचा हिस्सा ३९,२२७ कोटी रुपयांवरून ४२,१५४ कोटी रुपयांवर पोहोचला.

अदानी ग्रुप शेअर्समध्ये आता फंडांना रस

अदानी समूहाच्या शेअर्सची शानदार तेजी असूनही बहुतांश म्युच्युअल फंडांनी त्यापासून दूरच राहणं पसंत केलं. मात्र, आता त्यांचा कल बदलला असून ते सातत्याने खरेदी वाढवत आहेत. जून तिमाहीत प्रवर्तकांनी अदानी समूहाच्या शेअर्समधील हिस्सा वाढवला असताना म्युच्युअल फंडांचा त्यात रस वाढला आहे. प्रवर्तकांनी २३ हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले असून, त्यामुळे म्युच्युअल फंडांना सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Adani Ports मध्ये सर्वाधिक हिस्सा

अदानी समूहातील कंपन्यांपैकी म्युच्युअल फंडांचा सर्वाधिक हिस्सा अदानी पोर्ट्स अँड सेझमध्ये आहे. अदानी पोर्ट्समधील त्यांची मालमत्ता १३,१६९ कोटी रुपये असून, त्यापैकी १,१३९ कोटी रुपयांचा हिस्सा त्यांनी जुलैमध्ये खरेदी केला होता. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसमध्ये फंडांनी सर्वात मोठी खरेदी केली आणि त्यातील त्यांचा हिस्सा ८९० कोटी रुपयांनी वाढून ७३२४ कोटी रुपये झाला. अंबुजा सिमेंटबद्दल बोलायचं झालं तर त्यातील हिस्सा ३३८ कोटी रुपयांनी कमी होऊन ८९१० कोटी रुपयांवर आला आहे. 

अदानी पोर्ट्समधील सर्वात मोठा हिस्सा एसबीआय म्युच्युअल फंड (८५४ कोटी रुपये), कोटक म्युच्युअल फंड (१८८ कोटी रुपये) आणि यूटीआय म्युच्युअल फंड (१५२ कोटी रुपये) यांनी खरेदी केला. अदानी एंटरप्रायझेसमध्ये इन्वेस्को म्युच्युअल फंड (३७८ कोटी) आणि क्वांट म्युच्युअल फंड (१११ कोटी) यांचा समावेश आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Group Stocks Mutual Funds Investing in Adani Group Shares Most Buys Made in adani ports Stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.