Join us

अदानी समूह मोठं कर्ज काढणार, 3300 कोटी रुपये जमवणार! जाणून घ्या कुणाशी सुरू आहे बोलणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 3:02 PM

तब्बल 400 मिलियन डॉलर (जवळपास 3300 कोटी रुपये) एवढे कर्ज मिळवण्यासाठी अदानी समूहाची ग्लोबल क्रेडिट फंड्स सोबत चर्चा सुरू आहे.

आता अदानी समूह मोठे कर्ज मिळवण्याच्या तयारीत आहे. तब्बल 400 मिलियन डॉलर (जवळपास 3300 कोटी रुपये) एवढे कर्ज मिळवण्यासाठी अदानी समूहाची ग्लोबल क्रेडिट फंड्स सोबत चर्चा सुरू आहे. हे कर्ज एका मुख्य ऑस्ट्रेलियन कोल पोर्ट अॅसेट्सकडून घेण्याची अदानी समूराची इच्छा आहे. या पोर्ट एसेट्समधून कारमायकल खानीतून होणाऱ्या कोळशाच्या एक्सपोर्टचा मोठा हिस्सा जातो, असे इकनॉमिक टाइम्सच्या एका वत्तात म्हणण्यात आले आहे.

नॉर्थ क्विंसलँड एक्सपोर्ट टर्मिनलनंतर, फंड जमवण्याचा विचार - अदानी समूहाने फंड्स जमवण्यासाठी नॉर्थ क्विंसलँड एक्सपोर्ट टर्मिनलसंदर्भात (NQXT) विचार केला आहे. नॉर्थ क्विंसलँड एक्सपोर्ट टर्मिनल वर अदानी फॅमिली ट्रस्टचा कंट्रोल आहे. निधी उभारणीशी संबंधित प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हे सांगण्यात आले आहे. गेल्या एका महिन्यात अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर गेल्या एका महिन्यात 80 ट्क्यांहून अधिक कोसळले आहेत.

अदानी समूहाने बऱ्याच लर्ज हाय-यिल्ड फंड्ससोबत सुरू केलीय चर्चा -गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अदानी समूहाने अनेक लर्ज हाय-यिल्ड ग्लोबल क्रेडिट फंड्ससोबत बोलणी सुरू केली आहे आणि संभाव्य लेन्डर्सकडून समूहाला 2 इंडिकेटिव्ब टर्म शिट्स मिळाल्या आहेत. संभावित लेंडर्समध्ये हेज फंड फॅरालॉन कॅपिटलचाही समावेश आहे. मात्र अद्याप, अदानी समूह आणि फॅरालॉन कॅपिटलने यासंदर्भात कुटलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रॉयटर्सने नुकत्याच दिलेल्या एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या कॉर्पोरेट रेग्युलेटरने, ते शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालाचा आढावा घेतील, असे म्हटले आहे.

हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर, 150 बिलियन डॉलर्सनी घटले बाजारमूल्य -ऑस्ट्रेलियामध्ये अदानी समूह कारमायकल कोल माइन, त्याच्याशी संबंधित रेल लाईन, नॉर्थ क्विंसलँड एक्सपोर्ट टर्मिनल ऑपरेट करतो. क्विंसलँड एक्सपोर्ट टर्मिनल, क्विंसलँड कोल एक्सपोर्ट्स आणि सोलर फॉर्म्ससाठी एक मोठे पोर्ट आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अदानी समूहाचे बाजारमुल्य जवळपास 150 बिलियन डॉलरने घटले आहे.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय