Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

Adani Group Tamil Nadu Investment : यापूर्वी मुकेश अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:06 PM2024-01-09T19:06:02+5:302024-01-09T19:06:28+5:30

Adani Group Tamil Nadu Investment : यापूर्वी मुकेश अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Adani Group Tamil Nadu Investment: Gautam Adani's big announcement, will invest 42 thousand crores in tamilnadu | गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

Adani Group Tamil Nadu Investment : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाने तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये (Tamil Nadu Global Investors Meet) याची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत अदानी ग्रुप राज्यात 42,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अदानी पोर्ट्सचे एमडी करण अदानी (Karan Adani), यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. 

इतक्या कोटींची गुंतवणूक होणार
अदानी ग्रीन एनर्जी पुढील 5-7 वर्षांत तीन पंप स्टोरेज प्रकल्पांमध्ये 24,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, अदानी कोनेक्स (Adani Connex) पुढील सात वर्षांत हायपरस्केल डेटा सेंटरमध्ये 13,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. 42,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक योजनेअंतर्गत, अदानी टोटल गॅस 8 वर्षांत 1,568 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, तर अंबुजा सिमेंट पुढील पाच वर्षांत तीन सिमेंट ग्राइंडिंग प्लांटमध्ये 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

तमिळनाडूमध्ये अदानींचा मोठा व्यवसाय 
अदानी समूह आधीपासूनच तामिळनाडूमध्ये पोर्ट अँड लॉजिस्टिक, खाद्यतेल, वीज निर्मिती, गॅस वितरण, डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी, सिमेंट उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय करत आहे. अदानी पोर्ट्स कंपनी कट्टुपल्ली आणि एन्नोर बंदर चालवत आहेत, तर तिरुवल्लूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3,733 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही दोन्ही बंदरे राज्याच्या गरजा पूर्ण करत आहेत. याशिवाय कुड्डालोर आणि तिरुपूर जिल्ह्यांतील सिटी गॅसचे वितरण अदानी टोटल गॅसद्वारे केले जाते.

मुकेश अंबानींची रिलायन्सही तयार 
तमिळनाडूमध्ये 7-8 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांची आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी गुंतवणुकीत रस दाखवला. यापूर्वी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीज तामिळनाडूमध्ये अक्षय ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये गुंतवणूक करत आहे. 

Web Title: Adani Group Tamil Nadu Investment: Gautam Adani's big announcement, will invest 42 thousand crores in tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.