आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता पुन्हा एकदा सिमेंट क्षेत्रात मोठी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, अदानी समूहाने जर्मन कंपनी हिडलबर्ग मटेरिअल्सचा भारतातील सिमेंट उद्योग खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली आहे. या खरेदी प्रक्रियेचे नेतृत्व समूहातील अंबुजा सिमेंट करण्याची शक्यता आहे.
ही डील 1.2 अब्ज डॉलर म्हणजेच, 10000 कोटी रुपयांत होऊ शकतो. ही डील यशस्वी झाल्यास, इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या एकत्रीकरणची शर्यतीला गती येईल. देशातील टॉपची सीमेंटकंपनी अल्ट्राटेकही आपली पोझिशन कायम ठेवण्यासाठी कंपन्यांचे अधिग्रहण करत आहे.
अदानी ग्रुपही सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सीमेंट निर्माता कंपनी आहे. तिने 2022 मध्ये होलसिमच्या भारतातील उद्योगाची खरेदी करून सीमेंट उद्योगात प्रवेश केला होता. माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तांनुसास, अदानी ग्रुप होलसिम प्रमाणेच हिडलबर्ग सोबतची डीलही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. मात्र, इतर दावेदारही समोर आल्यास अदानी ग्रुप या प्रक्रियेतून बाहेरही पडू शकतो. जर्मन कंपनी भारतात लिस्टेड हिडलबर्ग सीमेंट इंडिया आणि अनलिस्टेड जुआरी सीमेंटच्या माध्यमाने ऑपरेशन करते.
भारतातील हिडलबर्गचे साम्राज्य -
हिडलबर्ग सीमेंट इंडियाचे मार्केट कॅप 4,957 कोटी रुपये एवढे आहे. 69.39% हिस्सेदारीही मूळ कंपनीची आहे. हिडलबर्ग ही जगातील सर्वात मोठ्या सीमेंट उत्पादकांपैकी एक आहे. 50 दशकांपासून कार्यरत आहे. हिडलबर्गने 2006 मध्ये म्हैसूर सीमेंट, कोचीन सीमेंट आणि इंडोरामा सीमेंटच्या जॉइंट व्हेंचरच्या अधिग्रहणासह भारतात प्रवेश केला होता. या डीलसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे आधिकृत वक्तव्य करण्यात करण्यात आलेले नाही.