Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group ने मिळवला क्रेडिटर्सचा विश्वास, Sovereign wealth fund द्वारे जमवले ३ अब्ज डॉलर्स

Adani Group ने मिळवला क्रेडिटर्सचा विश्वास, Sovereign wealth fund द्वारे जमवले ३ अब्ज डॉलर्स

सध्या समूह आपल्या क्रेडिट प्रोफाईलशी निगडीत चिंता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:20 PM2023-03-01T18:20:50+5:302023-03-01T18:22:02+5:30

सध्या समूह आपल्या क्रेडिट प्रोफाईलशी निगडीत चिंता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

Adani Group wins creditor s trust, raises 3 billion dollars through sovereign wealth fund Investment fund markets stocks | Adani Group ने मिळवला क्रेडिटर्सचा विश्वास, Sovereign wealth fund द्वारे जमवले ३ अब्ज डॉलर्स

Adani Group ने मिळवला क्रेडिटर्सचा विश्वास, Sovereign wealth fund द्वारे जमवले ३ अब्ज डॉलर्स

अदानी समूहाने सॉवरेन अब्ज वेल्थ फंडद्वारे (sovereign wealth fund) ३ अब्ज डॉलर्स उभारण्याची व्यवस्था केली आहे. या संदर्भात समूहाने आपल्या कर्जदारांना माहिती दिली आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहासाठी ही बातमी महत्त्वाची मानली जाते आहे. सध्या समूह आपल्या क्रेडिट प्रोफाइलशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी जारी केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार दोन सूत्रांनी सांगितले की सॉवरेन वेल्थ फंडमधून मिळालेल्या क्रेडिट लाईन ५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविली जाऊ शकते. या संदर्भात त्यांनी मेमोचा उल्लेखही केला, जो बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या इनव्हेस्टर रोड शोच्या सहभागींमध्ये विभागला गेला. दरम्यान, मेमोमधील सॉवरेन वेल्थ फंडाची ओळख उघडकीस आली नाही. दरम्यान, अदानी समूहाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसल्याचे रॉयटर्सने म्हटले.

रोड शो मध्ये माहिती
मार्च महिन्याच्या अखेरीस ६९ कोटी डॉलर्स ते ७९ कोटी डॉलर्स कर्जाची परतफेड करणे अपेक्षित असल्याचे अदानी समूहाच्या व्यवस्थापनाने एक दिवस आधी बॉण्डधारकांना सांगितले होते. समूहाने या आठवड्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये निश्चित उत्पन्नाच्या रोड शोमध्ये ही योजना उघड केली. शेअर्समध्ये मोठी घसरण आणि नियामक छाननी दरम्यान गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.

२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून, अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक घट झाली आहे. मात्र, अदानी समूहाने अमेरिकन शॉर्ट सेलरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

 

Web Title: Adani Group wins creditor s trust, raises 3 billion dollars through sovereign wealth fund Investment fund markets stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.