Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या

शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या

अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे शेअर्स तर सुरुवातीच्या ट्रेडिंगपासूनच अपर सर्किटला धडकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:53 PM2023-03-08T12:53:01+5:302023-03-08T12:54:19+5:30

अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे शेअर्स तर सुरुवातीच्या ट्रेडिंगपासूनच अपर सर्किटला धडकले.

Adani Group's rise in the stock market, companies on the upper circuit; 2 happy news for investors | शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या

शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या

शेअर बाजारात आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास मोठी घसरण बघायला मिळाली. मात्र असे असले तरी, अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटवर आहेत. अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे शेअर्स तर सुरुवातीच्या ट्रेडिंगपासूनच अपर सर्किटला धडकले. यातच अदानी समूहाशी संबंधित गुंतवणूकदारांसाठी नुकत्याच 2 आनंदाच्या बातम्या आल्या आहेत.

अशा आहेत बातम्या - 
मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत अदानी समूहाने म्हटले आहे की, त्यांनी 7374 कोटी रुपयांच्या शेअर बॅक्ड फायनांसिंगचे देणे वेळेपूर्वीच केले आहे. हे सर्व 2025 मध्ये मॅच्योर होत होते. याशिवाय, याच महिन्याच्या अखेरीस अशा सर्व सर्व कर्जाची परतफेड केली जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी, अदानी समूहाच्या 4 कंपन्यांमध्ये जीक्यूजी पार्टनर्सने गुंतवणूक केली होती. याच गुंतवणुकीनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.

या कंपन्यांचे शेअर्स आज अपर सर्किटवर? - 
आज सकाळच्या सुमारास, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 5-5 टक्क्यांचे अपर सर्किट लागले होते. याशिवाय, अदानी एंटरप्राइजेस 3 टक्के, अदानी पोर्ट्स 1.38 टक्के, NDTV सकाळी 2.58 टक्के, ACC सीमेंट 1.17 टक्के आणि अम्बुजा सीमेंट 0.90 टक्के तेजीसह व्यवहार करत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: Adani Group's rise in the stock market, companies on the upper circuit; 2 happy news for investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.