Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार

जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार

अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:16 PM2023-06-23T17:16:38+5:302023-06-23T17:20:53+5:30

अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करणार आहे.

adani is going to invest thousands of crores in uttar pradesh build a data centre in noida | जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार

जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार

उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी समुहाची कंपनी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये डेटा सेंटर बनवणार आहे. यासाठी कंपनीने कर्जही घेतले आहे. शुक्रवारी Adani Enterprises ने या संदर्भात माहिती दिली.  AdaniConneX ने आंतरराष्ट्रीय बँकेकडून 213 मिलियन डॉलर कर्ज घेतले आहे. हा प्रकल्प EdgeConneX सह संयुक्त उपक्रमात केला जात आहे.

अमेरिकेतून बातमी आली अन् Adani ग्रुपचे शेअर्स कोसळले; संपूर्ण आठवडा ठरला वाईट...

अदानी एंटरप्रायझेसने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या पैशाचा वापर चेन्नई आणि नोएडामध्ये डेटा सेंटर्स तयार करण्यासाठी करणार आहे. चेन्नई डेटा सेंटरची क्षमता 17 मेगावॅट आणि नोएडा डेटा सेंटरची क्षमता 50 मेगावॅट असेल.

वाढती मागणी लक्षात घेऊन अदानी समूह आयटी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे. AdaniConneX भविष्यात 1 GW डेटा सेंटर प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या योजनांवर काम करत आहे. देशभरात डेटा सेंटरचा वेगाने विस्तार करणे हा या कंपनीचा फोकस आहे. कंपनीचे सीईओ जयकुमार जनकराज म्हणाले की,  2030 पर्यंत 1 GW क्षमतेचे डेटा सेंटर तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. नोएडा आणि चेन्नई येथे बांधण्यात येणारी डेटा सेंटर्स ही याच योजनेतील पहिली लिंक आहे.

शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. NSE वर दुपारी 2.30 वाजता कंपनीचे शेअर्स 2220 रुपयांच्या आसपास व्यवहार करते. गेल्या एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.

Web Title: adani is going to invest thousands of crores in uttar pradesh build a data centre in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.