Join us  

Adani News : अदानींवरील शॉर्ट सेलर अटॅकमध्ये कोणाचा हात, कोण आहेत यातील मुख्य पात्रं? वाचा हा संपूर्ण रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 2:00 PM

Adani News : गेल्या वर्षी अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टमुळे खळबळ उडाली होती. यामुळे समूहाला तब्बल १५३ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. अदानींवरील या शॉर्ट सेलर हल्ल्यात कोणाचा सहभाग होता, हे रिपोर्टमधून उघड झालं आहे.

Adani News : गेल्या वर्षी अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टमुळे खळबळ उडाली होती. यामुळे समूहाला तब्बल १५३ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. अदानींवरील या शॉर्ट सेलर हल्ल्यात कोणाचा सहभाग होता, हे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून उघड झालं आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या शॉर्टसेलर हल्ल्यामागं एक अॅक्टिव्हिस्ट शॉर्टसेलर, न्यूयॉर्क हेज फंड, मॉरिशस स्थित गुंतवणूकदार आणि एका मोठ्या भारतीय बँकेशी संबंधित ब्रोकरची भूमिका होती.

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्च आणि सेबी यांच्यातील नव्या शाब्दिक युद्धामुळे अदानी समूहाविरोधातील रिपोर्टमागील छुप्या पात्रांची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. हिंडेनबर्गनं सोमवारी आपल्या वेबसाईटवर सर्वाचं खंडन करत सेबीच्या 'कारणे दाखवा नोटीस'ची लिंक जोडली आहे.

मुख्य पात्र कोण?

सेबीच्या पत्रात पहिल्यांदाच असं दिसून आलंयकी हिंडेनबर्गनं आपला अदानी रिसर्च प्रकाशित होण्यापूर्वी किंगडन कॅपिटल मॅनेजमेंट एलएलसीला सादर केलं होतं आणि दोन्ही कंपन्यांमध्ये नफा वाटणीचा करार झाला होता. न्यूयॉर्क हेज फंडानं हिंडेनबर्गपेक्षा शॉर्ट बेट्सवर तिप्पट जास्त पैसे कमावले. याशिवाय किंग्डननं हा व्यापार करण्यासाठी भारतातील एका मोठ्या बँकांपैकी एका बँकेची मदत घेतली.

हिंडेनबर्ग आणि त्याचे संस्थापक नॅथन अँडरसन, किंग्डनचे संस्थापक मार्क किंगडन आणि मॉरिशसस्थित गुंतवणूकदार के इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड यांना पाठविण्यात आलेली ही नोटीस अदानींची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडच्या आसपासच्या ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीच्या सेबीच्या चौकशीचा एक भाग आहे. किंग्डनने हिंडेनबर्गबरोबर नफा वाटपाचा करार केला होता. अदानी शॉर्ट बेटसाठी के इंडिया फंडाच्या माध्यमातून ट्रेड्स रूट करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त वेळ आणि प्रयत्न यामुळे ही वजावट २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.

डिसेंबरच्या अखेरीस किंगडननं फंडाचे शेअर्स सबस्क्राइब करण्यास सुरुवात केली. जानेवारी महिन्यात अदानी एंटरप्रायझेसमध्ये शॉर्ट पोझिशन तयार करण्यासाठी दोन हप्त्यांमध्ये ४३ मिलियन डॉलर्स ट्रान्सफर केले. किंगडन कॅपिटलनं कोटक महिंद्रा (इंटरनॅशनल) लिमिटेड अर्थात केएमआयएलसोबत करार केल्याचंही ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

८,५०,००० शेअर्ससाठी शॉर्ट पोझिशन

हा रिपोर्ट प्रसिद्ध होण्याच्या काही दिवस आधी के इंडिया फंडाने १० ते २० जानेवारी दरम्यान फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून ८,५०,००० शेअर्ससाठी शॉर्ट पोझिशन्स तयार केल्या आणि १ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान या पोझिशन्स स्वेअर ऑफ केल्या. यातून २२.३ मिलियन डॉलरचा नफा झाला, असं सेबीनं नोटीसमध्ये म्हटलंय. किंग्डनने हिंडेनबर्गवर शॉर्ट सेलरसोबतच्या कराराचा एक भाग म्हणून ५.५ दशलक्ष डॉलर्स शिल्लक ठेवले होते. सेबीच्या नोटनुसार, १ जूनपर्यंत सुमारे ४.१ मिलियन डॉलर्स देण्यात आले होते.

कोटक बँकेनं काय म्हटलं?

कोटक बँकेनं मंगळवारी एक निवेदन जारी केलं. हिंडेनबर्ग कधीही कोटक महिंद्रा इंटरनॅशनलचा ग्राहक नव्हता किंवा के इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडात कधीही गुंतवणूकदार नव्हता. हिंडेनबर्ग आपल्या कोणत्याही गुंतवणुकीत भागीदार आहे हे फंडाला कधीच माहित नव्हतं, असं त्यांनी निवेदनाद्वारे म्हटलंय.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार