नवी दिल्ली-
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने (APSEZ) ओशन स्पार्कल या अग्रगण्य भारतीय थर्ड-पार्टी सागरी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीची १०० टक्के भागीदारी विकत घेतली आहे. APSEZ ने हे त्यांच्या उपकंपनी अदानी हार्बर सर्व्हिसेस मार्फत १,५३० कोटी रुपयांना हा व्यवहार केला आहे. कंपनीने सागरी सेवा विभागात आपला विस्तार करण्याच्या धोरणानुसार हा करार केला आहे. महिनाभरात हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
APSEZ OSL मधील ७५ टक्के स्टेकसाठी १,१३५.३० कोटी रुपये देईल. यासह, APSEZ OSL मधील २४.३१ टक्के समभाग अप्रत्यक्ष संपादनासाठी ३९४.८७ कोटी रुपये देईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, Ocean Sparkle ही अदानी हार्बर सर्व्हिसेस या अदानी समूहाच्या पूर्ण मालकीची कंपनी बनेल. APSEZ चे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक करण अदानी म्हणाले की, "ओएसएल आणि अदानी हार्बर सर्व्हिसेसमधील समन्वय पाहता, असे म्हणता येईल की मार्जिनमधील सुधारणेसह एकत्रित व्यवसाय पुढील पाच वर्षांत दुप्पट होऊ शकतो. यामुळे APSEZ च्या भागधारकांसाठी जबरदस्त व्हॅल्यू तयार केली जाईल" या संपादनामुळे कंपनीला इतर देशांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
Ocean Sparkle बद्दल जाणून घ्या
Ocean Sparkle ची सुरुवात २६ जुलै १९९५ रोजी झाली. ही कंपनी पोर्ट ऑपरेशन्स आणि व्यवस्थापन सेवा प्रदान करते. यामध्ये मरीन क्राफ्टचे तांत्रिक व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. भारताव्यतिरिक्त ओएसएल कंपनी श्रीलंका, सौदी अरेबिया, येमेन, कतार आणि आफ्रिकेत व्यवसाय करते.