Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे

Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन देशातील सर्वात मोठी पोर्ट्स कंपनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:05 PM2022-10-11T13:05:01+5:302022-10-11T13:09:09+5:30

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन देशातील सर्वात मोठी पोर्ट्स कंपनी आहे.

adani ports receive nclt approval to acquire remaining 58 percent stake in gangavaram port know the details 12 ports with adani group gautam adani karan adani | Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे

Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सध्या आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहेत. दरम्यान, आणखी एका बंदराचा ताबा त्यांनी आपल्याकडे घेतला आहे. गंगावरम पोर्ट लि. (Gangavaram Port Ltd) गौतम अदानी यांच्याकडे आले आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने (APSEZ) गंगावरम बंदरातील संपूर्ण हिस्सा विकत घेतला आहे. गंगावरम हे आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे नॉन मेजर पोर्ट आहे.

या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के हिस्साही विकत घेतला आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमधील बंदरांची संख्या आता 12 झाली आहे.

या अधिग्रहणात 120 रुपये प्रति शेअर दराने 6200 कोटी रुपयांचे 517 मिलियन शेअर्सचा समावेश आहे. अदानी पोर्ट्स डीव्हीएस राजू आणि कुटुंबाकडून शेअर स्वॅप व्यवस्थेद्वारे 58.1 टक्के स्टेक घेणार आहे. गंगावरम बंदर हे सर्व हवामानातील खोल पाण्याचे बहुउद्देशीय बंदर आहे. हे 200,000 DWT पर्यंत पूर्ण लोड केलेल्या सुपर कॅप आकाराच्या जहाजांना हाताळण्यास सक्षम आहे. सध्या बंदरात 9 धक्के कार्यरत आहेत.

रेल्वे आणि रस्ते मार्गांनी जोडलेले
गंगावरम बंदराचे अधिग्रहण भारतातील सर्वात मोठी वाहतूक उपयुक्तता म्हणून आमचे स्थान मजबूत करेल. गंगावरम बंदरात उत्कृष्ट रेल्वे आणि रस्ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे आणि आठ राज्यांमध्ये पसरलेल्या व्यापाराचे प्रवेशद्वार आहे, अशी माहिती एका नियामक फाइलिंगमध्ये अदानी पोर्ट्स स्पेशल इकॉनॉमिक झोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक करण अदानी यांनी दिली.

Web Title: adani ports receive nclt approval to acquire remaining 58 percent stake in gangavaram port know the details 12 ports with adani group gautam adani karan adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.