Adani Ports Share: अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सबाबत एक्सपर्ट बुलिश दिसून येत आहेत. अदानी पोर्ट्सच्या तिमाही निकालानंतर तज्ज्ञांनी शेअरच्या चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केली आहे. ब्रोकरेज हाऊसनं दिलेली नवी टार्गेट प्राइस सध्याच्या भावापेक्षा ३०० रुपये जास्त आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स वाढीसह १६०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते.
काय म्हणतात तज्ज्ञ?
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज कंपन्या अदानी पोर्ट्सवर बुलिश आहेत. कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे आले आहेत. तसंच भविष्यात चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यवस्थापनानं व्यक्त केलीये. अदानी पोर्ट्सनं गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले.
निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ
कंपनीनं जाहीर केलेल्या निकालानुसार निव्वळ नफ्यात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा एकूण नफा ३११३ कोटी रुपये झाला आहे. यावेळी अदानी पोर्टचा महसूल ६९५६ कोटी रुपये झाला. जो मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल ६२४७.६० कोटी रुपये होता. जून तिमाहीत कंपनीचा एबिटडा २९ टक्क्यांनी वाढून ४८४७ कोटी रुपयांवर पोहोचला.
काय आहे नवी टार्गेट प्राइस?
जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं अदानी पोर्ट्सला 'बाय' रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं शेअरसाठी १६४० रुपयांपासून १९१० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलं आहे. दुसरीकडे गोल्डमन सॅक्सनं टार्गेट प्राइस मध्ये १६३० रुपयांनी वाढ करून १८०० रुपये केलं आहे. हे सध्याच्या किमतीपेक्षा २०० रुपये जास्त आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)