Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आलीय. या शेअर्सवर एक्सपर्टही बुलिश आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:34 PM2024-05-03T12:34:36+5:302024-05-03T12:35:14+5:30

Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आलीय. या शेअर्सवर एक्सपर्टही बुलिश आहेत.

Adani Ports Share Price Adani Group stock May Cross rs 1700 Doubling money in a year brokerage bullish | Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा शेअर कामकाजादरम्यान १३५४.४० रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्सचा शेअर हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ आलाय. शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरबद्दल बुलिश दिसून येत आहेत. अदानी पोर्ट्सचे शेअर्स १७०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीये. कंपनीच्या मार्च २०२४ तिमाहीच्या दमदार निकालानंतर काही ब्रोकरेज कंपन्यांनी अदानी पोर्ट्सच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १४२५ रुपये आहे.
 

जागतिक ब्रोकरेज हाऊस सिटीनं अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअर्सची टार्गेट प्राइस १७८२ रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच अदानी पोर्ट्सचे शेअर्स सध्याच्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत जवळपास ३३ टक्क्यांनी वाढू शकतात. सिटीनं यापूर्वी अदानी पोर्ट्सच्या शेअर्ससाठी १७५८ रुपयांचं टार्गेट ठेवलंय. सिटीच्या म्हणण्यानुसार, अदानी पोर्ट्सचे मार्च २०२४ तिमाहीचे निकाल दमदार आहेतच, पण आर्थिक वर्ष २०२५ साठीदेखील हेल्दी गाईडन्स दिलंय. ब्रोकरेज हाऊस जेफरीजनेही अदानी पोर्ट्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. जेफरीजनं अदानी पोर्ट्सच्या शेअर्ससाठी १,६४० रुपयांचं टार्गेट दिलंय. तर एचएसबीसीनं अदानी पोर्ट्सच्या शेअर्ससाठी १५६० रुपयांचे टार्गेट दिलं आहे.
 

वर्षभरात १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ
 

गेल्या वर्षभरात अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स १०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सनं वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. ३ मे २०२३ रोजी अदानी पोर्ट्सचा शेअर ६६९.८५ रुपयांवर होता. ३ मे २०२४ रोजी कंपनीचा शेअर १३५४.३० रुपयांवर पोहोचला. तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये गेल्या ६ महिन्यांत जवळपास ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ७९५.४५ रुपयांवर होता, जो आता १३५० रुपयांच्या पुढे गेला आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ६५९.८५ रुपये आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Ports Share Price Adani Group stock May Cross rs 1700 Doubling money in a year brokerage bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.