Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Power Stocks : अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

Adani Power Stocks : अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

सहा कंपन्यांचं होणार अदानी पॉवरमध्ये विलिनीकरण, मिळाली मंजुरी.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:47 PM2022-03-23T16:47:02+5:302022-03-23T16:47:19+5:30

सहा कंपन्यांचं होणार अदानी पॉवरमध्ये विलिनीकरण, मिळाली मंजुरी.

adani power board okays merger of 6 wholly owned subsidiaries stock surges up to 8 percent stock took rocket speed bse | Adani Power Stocks : अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

Adani Power Stocks : अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

Adani Power Stock: आपल्या संपूर्ण मालकीच्या असलेल्या सहा कंपन्यांच्या अदानी पॉवरमध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेला संचालक मंडळानं मंजुरी दिली आहे. "२२ मार्च २०२२ रोजी झालेल्या बैठकीत आवश्य मंजुरी आणि सहमतीच्या अधीन राहत, कंपनीच्या पूर्ण मालकीच्या विविध उपकंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे," असी माहिती बीएसई फायलिंगमध्ये देण्यात आली.

फाइलिंगनुसार, अदानी पॉवरमध्ये विलीन होणार्‍या उपकंपन्यांमध्ये अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, अदानी पॉवर (मुंद्रा) लिमिटेड, उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड आणि रायगड एनर्जी जनरेशन लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या अदानी पॉवरची पूर्ण मालकी असलेल्या उपकंपन्या आहेत.

दरम्यान, या सहा कंपन्यांची संपूर्ण संपत्ती आणि दायित्वे अदानी पॉवरकडे हस्तांतरीत केली जातील, असं सांगण्यात आलं आहे. तसंच या योजनेअंतर्गत कंपनीच्या इक्विटी शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीद्वारे कोणतेही शेअर्स जारी करण्यात येणार नाहीत. अदानी पॉवरच्या सहा शाखाही वीज निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहेत.

या वृत्तानंतर अदानी पॉवरच्या शेअरमध्ये  (Adani power share price) जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच कंपनीच्या शेअरनं ८.५७ टक्क्यांची उसळी घेतली आणि १३४.३५ रुपयांवर पोहोचला. परंतु बाजार बंद होताना त्यात थोडी घसरण झाली असून तो १३०.०५ रुपयांवर बंद झाला.

Web Title: adani power board okays merger of 6 wholly owned subsidiaries stock surges up to 8 percent stock took rocket speed bse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.