Bangladesh :बांगलादेशात मागील काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनामुळे देशात मोठी उलथा पालथ झाली. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशही सोडला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडताच बांगला देश अंधारात बुडाला आहे, म्हणजेच देशात विजेचे संकट सुरू झाले आहे.
बांगलादेशनंतर थायलंडमध्ये पंतप्रधानांची हकालपट्टी; न्यायालयाने श्रेथा थाविसिन यांना हटविले
महागाई आणि बेरोजगारीचा चटका सहन करत असलेला बांगलादेश लवकरच अंधारात बुडणार आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अदानी पॉवरचा कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प, जो आतापर्यंत फक्त बांगलादेशलाच वीज विकू शकत होता, आता तो प्रकल्प भारतालाही वीज विकणार आहे. याआधी तो प्रकल्प बांगलादेशला वीज विकण्याच्या करारावर काम करत होता. पण आता नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे भारतालाही आपला वीजपुरवठा पूर्ण करता येणार आहे.
भारताच्या वीज निर्यात नियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर, ते देशांतर्गत बाजारपेठेतही वीज पुरवठा करू शकतात. हे पाऊल कंपनीला बांगलादेशातील राजकीय परिस्थीतीपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करणार आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या उर्जा मंत्रालयाच्या मेमोने शेजारच्या देशाला वीज पुरवठा करणाऱ्या जनरेटर (वीज कंपन्या) नियंत्रित करणाऱ्या २०१८ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केल्या आहेत. सध्या भारतातील फक्त एक प्लांट बांगलादेशाला १०० टक्के वीज निर्यात करण्यासाठी कराराखाली आहे. झारखंडमध्ये असलेल्याअदानी पॉवरचा १,६०० मेगावॅट प्लांट आहे. या प्लांटमधून बांगलादेशाला वीज पुरवली जाते.
प्रकल्पांना फायदा होणार
या निर्णयामुळे भविष्यातील प्रकल्पांनाही फायदा होऊ शकतो. करार निर्यातशी जोडलेले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून निदर्शने सुरू आहेत.यामुळे त्यांनी देश सोडला, यानंतरच भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने केलेल्या दुरुस्तीमुळे पेमेंटला उशीर झाल्यास स्थानिक ग्रीडला वीज विकण्याची परवानगी दिली आहे. प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर लगेचच गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली होती.दरम्यान, आथा या दुरुस्तीमुळे भारतातील विजेची एकूण उपलब्धता वाढण्यास मदत होईल आणि देशभरातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होऊ शकते.