मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहातील कंपन्या शेअर बाजारात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना संकटाच्या काळात अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने गेल्या आठवड्यात मोठी उसळी घेतल्यानंतर आणखी एका कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दोन दिवस १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. (adani power share huge buying in market increased by 19 percent)
अदानी समूहातील अदानी पॉवर कंपनीचे शेअर्समध्ये तेजीची लाट असल्याचे दिसून येत आहे. अदानी पॉवरचा शेअर ११२ रुपयांवर खुला झाला होता. त्याने दिवसभरात १२६.५ रुपयांची उच्चांकी झेप घेत १९ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्यानंतर पुन्हा मंगळवारी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सलग दुसऱ्या दिवशी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये १९.६५ टक्क्यांची वाढ होऊन १५१.९० रुपयांवर बंद झाला.
केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत
तिसऱ्या तिमाहीचे तुलनेत २.७८ टक्के घसरण
जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला विक्रीतून ६९०२.०१ कोटींचा महसूल मिळाला. त्यात तिसऱ्या तिमाहीचे तुलनेत २.७८ टक्के घसरण झाली. तर वार्षिक आधारावर महसूल ९.०८ टक्क्यांनी कमी झाला. दानी समूहाने गेल्या वर्षभरात नवनव्या क्षेत्रात गुंतवणूक करून विस्तार केला आहे. याच काळात समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीतदेखील प्रचंड वाढ झाली आहे. एकूण ७६ अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानी आहेत.
‘ही’ कंपनी पॉलिसीधारकांना देतेय तब्बल ८६७ कोटींचा बोनस; यंदा १० टक्के वाढ
दरम्यान, गेल्या आठवडाभरात अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरमध्ये ३० टक्के वाढ झाली. तर याच काळात बीएसई सेन्सेक्स १.५ टक्क्यांनी वधारला. अदानी एन्टरप्राइजेसचे बाजार भांडवल १८७०९९.६९ कोटी इतके झाले असून, अदानी टोटल गॅस या कंपनीला मागे टाकले असून, आता अदानी समूहातील सर्वांत मूल्यवान कंपनी होण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेस केवळ १० टक्के दूर आहे. अदानी एन्टरप्राइजेसला मार्च तिमाहीत २३४ कोटींचा नफा झाला आहे. अदानी एन्टरप्राइजेसच्या तिमाहीत नफ्यात २८४ टक्के वृद्धी झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीला ६१ कोटींचा नफा झाला होता.