Join us

अदानींच्या 'या' शेअरवर गुंतवणूकदारांचा भरवसा; पकडला रॉकेट स्पीड, ११५% वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 3:33 PM

गेल्या पाच वर्षांत हा शेअर 1,474.16 टक्क्यांनी वाढलाय.

Adani Power Share: अदानी पॉवरच्या शेअर्सवर सध्या गुंतवणूकदारांचा भरवसा वाढत असल्याचं दिसून येत आहे. अदानी पॉवरमध्ये वेळोवेळी सातत्यानं गुंतवणूक केली जात आहे. दोन संस्थांनी 5 ते 25 सप्टेंबर दरम्यान खुल्या बाजारातून अदानी पॉवरमधील 2.2 टक्के भागभांडवल विकत घेतले. फोर्टिट्युड ट्रेड अँड इनव्हेस्टमेंट लिमिटेड आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट लिमिडेट अशी या गुंतवणूकदारांची नावं आहेत.अदानी पॉवरच्या प्रमोटर समूहाची दोन युनिट्स फोर्टिट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट लिमिटेडनं खुल्या बाजारातील खरेदीद्वारे कंपनीतील 2.2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. फोर्टिट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडनं 5-21 सप्टेंबर दरम्यान 1.71 टक्के हिस्सा मिळवत 6,58,47,000 शेअर्स खरेदी केले आहेत. तर इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंटनं 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान 0.5 टक्के स्टेक म्हणजेच 1,92,00,000 शेअर्स खरेदी केले आहेत.कंपनीचे शेअर्सकंपनीच्या शेअर्स गुरुवारी 374.40 रुपयांची पातळी गाठली होती. गेल्या सहा महिन्यांत शेअरच्या किंमतीत 115.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत त्याची किंमत 173 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली. या वर्षी YTD मध्ये स्टॉक 25.57 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 1,474.16 टक्क्यांनी वाढलाय.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :अदानीशेअर बाजारगुंतवणूक