Join us

Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 1:40 PM

Adani Power Bangladesh : पाहा काय आहे यामागचं कारण,जाणून घ्या का बांगलादेशनं उचललं मोठं पाऊल?

अदानी पॉवरची (Adani Power) उपकंपनी असलेल्या अदानी पॉवर झारखंड लिमिटेडने (APJL) ८४.६ दशलक्ष डॉलर्सच्या थकित बिलामुळे बांगलादेशला होणारा वीजपुरवठा निम्म्यानं कमी केला आहे. बांगलादेशातील वृत्तपत्र 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार पॉवर ग्रिड बांगलादेश पीएलसीच्या आकडेवारीनुसार अदानी समूहाच्या वीज प्रकल्पानं गुरुवारी रात्रीपासून पुरवठा कमी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशमध्ये गुरुवार ते शुक्रवार दरम्यान रात्री १६०० मेगावॅटपेक्षा जास्त विजेचा तुटवडा जाणवला. याचं कारण म्हणजे सुमारे १४९६ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आता एका युनिटमधून केवळ ७०० मेगावॅट वीजनिर्मिती करत आहे.

२७ ऑक्टोबरला लिहिलेलं पत्र

यापूर्वी अदानी पॉवरनं बांगलादेशच्या ऊर्जा सचिवांना पत्र लिहून बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाला (PDB) ३० ऑक्टोबरपर्यंत थकबाकी भरण्यास सांगितलं होतं. थकित बिलं न भरल्यास कंपनीला ३१ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित करावा लागेल आणि वीज खरेदी करारानुसार (PPA) आवश्यक पावलं उचलावी लागतील, असं अदानी समूहाच्या कंपनीने २७ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

१७ कोटी डॉलर्स दिले नाही

पीडीबीनं बांगलादेश कृषी बँकेकडून १७ कोटी डॉलर्सचे कर्ज दिलं नाही किंवा ८४.६ कोटी डॉलर्सची थकित रक्कम भरली नाही असं अदानी पॉवरनं म्हटलं. डेली स्टारनं पीडीबीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलं की, मागील थकबाकीचा काही भाग आधी भरला गेला होता, परंतु जुलैपासून एपीजेएल मागील महिन्यांपेक्षा जास्त शुल्क आकारत आहे. पीडीबी दर आठवड्याला सुमारे १.८ कोटी डॉलर्स देत आहे, तर शुल्क २.२ कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे मोठा बॅकलॉग तयार झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :बांगलादेशअदानीभारनियमन