Join us  

Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 9:28 AM

Adani's Big Move: अदानी समूहानं एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला असून त्याचा फायदा अनेकांना होणार आहे. काय आहे हा प्रोजेक्ट आणि काय होणार फायदा जाणून घेऊ.

Adani's Big Move: गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाने (Adani Group) देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठा कार्यक्रम सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, निव्वळ शून्य प्रदूषणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अदानी समूहानं अहमदाबादच्या काही भागात घरांना पुरविल्या जाणाऱ्या पाईप नैसर्गिक वायूमध्ये ग्रीन हायड्रोजन मिसळण्यास सुरुवात केली आहे. 

कंपनीने लिंक्डइनवरील पोस्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिलीये. समूहाचं शहर गॅस वितरण युनिट अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि फ्रान्सची ऊर्जा कंपनी टोटल एनर्जी यांनी अहमदाबादमधील शांतीग्राम येथील पाईपाद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये २.२ ते २.३ टक्के ग्रीन हायड्रोजन मिसळण्यास सुरवात केली असल्याचं यात सांगण्यात आलंय.

हायड्रोजन गॅस कसा तयार होतो?

ग्रीन हायड्रोजन रिन्यूएबल एनर्जीपासून बनवलं जातं. ते नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनमध्ये टाकलं जाते. यामुळे कमी उत्सर्जनासह उष्णता आणि वीज निर्मिती होते. कंपनी पवन किंवा सौर ऊर्जेसारख्या रिन्यूएबल एनर्जी स्त्रोतांचा वापर करून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करीत आहे. यासाठी इलेक्ट्रोलिसिस नावाची प्रक्रिया वापरली जाते. यामध्ये पाण्याचं हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विभाजन केलं जातं. हा हायड्रोजन सध्या स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी आणि उद्योगांना पाईपलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये मिसळला जातो.

या प्रकल्पामुळे ४,००० घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना हायड्रोजन मिश्रित नैसर्गिक वायू विनाअडथळा उपलब्ध होणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

आणखी कोणाकडून पुरवठा?

सध्या सरकारी वीज कंपनी एनटीपीसी गुजरातमधील सुरतमधील कावास येथील घरांना ग्रीन हायड्रोजन मिश्रित नैसर्गिक वायूचा पुरवठा करते. सरकारी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेड मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सीएनजी पुरवठ्यासाठी एक छोटा पायलट प्रोजेक्ट चालवत आहे. त्यात ग्रे हायड्रोजनची भर पडली आहे. एटीजीएलचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानी