Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani NDTV Stakes : अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार

Adani NDTV Stakes : अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार

Adani NDTV Stakes : अदानी समुहानं निवेदनाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:19 PM2022-08-23T18:19:56+5:302022-08-23T18:21:41+5:30

Adani NDTV Stakes : अदानी समुहानं निवेदनाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Adani s entry into the media sector India s Adani to buy 29 2 percent stake in NDTV launch open offer | Adani NDTV Stakes : अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार

Adani NDTV Stakes : अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार

Adani NDTV Stakes : अदानी समुहाची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडनं (AMNL) इनडायरेक्ट पद्धतीनं एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह एनटीव्हीमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर सादर करणार आहे.

AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) मार्फत हे अधिग्रहण केले जाईल. AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची कंपनी आहे.



यासंदर्भात अदानी समुहाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार VCPL कडे RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचा 99.5 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा अधिकार होता. VCPL नं याच अधिकारानुसार स्टेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेटची प्रमोटर ग्रुप कंपनी आहे. मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये त्यांचा 29.18 टक्के हिस्सा आहे. तोच अदानी समूहाकडून खरेदी करण्यात येणार आहे. VCPL 26 टक्क्यांपेक्षा जास्त स्टेक घेत आहे, त्यामुळे SEBI च्या टेकओव्हर नियमांनुसार ओपन ऑफर द्यावी लागेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

एएमएनएल आणि अदानी एन्टरप्राईजेस सोबत एकत्र मिळून व्हिसीपीएल आता एनडीटीव्हीमध्ये 26 टक्के स्टेकसाठी ओपन ऑफर लाँच करेल. न्यू एज मीडिया प्लॅटफॉर्मच्या मार्गात हे अधिग्रहण मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया एएमएनएलचे सीईओ संजय पुगलिया यांनी सांगितलं.

Web Title: Adani s entry into the media sector India s Adani to buy 29 2 percent stake in NDTV launch open offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.